शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

ठाणे रेल्वे स्थानक असुविधांचे माहेरघर; डीआरएम गोयल यांना प्रवासी संघटनेचे साकडे

By अनिकेत घमंडी | Updated: February 27, 2024 16:40 IST

खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंगळवारी गोयल यांना ठाणे स्थानकात बोलावून त्यांना समस्या प्रत्यक्षात दाखवल्या.

डोंबिवली : ब्रिटिशांनी बांधलेल्या भारतातील सर्वात पहिल्या ठाणेरेल्वे स्थानक हे असुविधांचे माहेरघर झाले आहे. डीआरएम रजनीश गोयल तुम्ही जरा इथे लक्ष घालावे असे साकडे ठाणेरेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी घातले. माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मंगळवारी गोयल यांना ठाणे स्थानकात बोलावून त्यांना समस्या प्रत्यक्षात दाखवल्या. त्यावेळी झालेल्या चर्चेत देशमुख यांनी गार्हाणे मांडत निवेदन दिले.

देशमुख म्हणाले की, मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सर्वात जुन्या पुलाचा प्लँटफाँर्म नं २ ते ५/६ दरम्यानचा भाग पाडण्यात आला आहे, त्याची लवकरात लवकर पुर्नबांधणी करणे आवश्यक आहे. सध्याचा कल्याण दिशेकडील पुल पश्र्चिमेला प्लँटफाँर्म नं २ वर जेथे उतरतो त्याच ठिकाणी बाहेर पडण्यासाठी गेट बनवणे आवश्यक आहे. ठाणे स्टेशनात अधिक संख्येने दुचाकी उभ्या करण्यासाठी प्लँटफाँर्म नं.१ च्या बाहेर असलेल्या पार्किंग प्लाझा इमारतीच्या नियोजित असलेल्या तिसऱ्या व चवथ्या मजल्याचे बांधकाम करणे. ठाणे स्टेशनात थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांची वेळ, प्लँटफाँर्म नंबर व सर्व डब्यांची स्थिती एकत्रित दर्शवण्यासाठी जे जुन्या पध्दतीचे इंडिकेटर फार पूर्वीपासून बसवलेले आहेत, ते काढून त्याऐवजी कल्याण स्टेशनात जसे एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा व कोच दर्शवणारे, दुरवरून दिसणारे आधुनिक एलईडी पध्दतीचे, इंडिकेटर, सर्व ठिकाणी बसवलेले आहेत, तसे इंडीकेटर ठाणे स्टेशनात सर्व ठिकाणी बसवावेत. ठाणे स्टेशनात मेल/एक्सप्रेस गाड्यांची वहातूक प्लँटफाँर्म नं. ५, ६, ७, ८ वरून होत असल्याने, प्लँटफाँर्म नं ५/६ व ७/८ च्या मध्ये, रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोई साठी एलिव्हेटेड वेटिंग रूम तयार करणे आवश्यक. ठाणे स्टेशनात पश्र्चिम बाजूला सर्व तिकीट खिडक्या मुंबईच्या दिशेला बनवले आहेत.

ठाणे पश्चिमेकडील एसटी स्टॅन्ड जवळील प्रवेशद्वार, तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील प्रवेशद्वार येथे तिकीट मिळण्याची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना तिकीट/पास काढण्यासाठी मुंबई टोकाच्या बुकिंग ऑफिस पर्यंत ये-जा करावी लागते. ह्यात प्रवाशांचा वेळ वाया जातो व स्टेशनात तसेच स्टेशन बाहेरच्या भागांत विनाकारण माणसांची वर्दळ वाढते. ह्यासाठी ह्या दोन गेटच्या जवळही दोन/तीन खिडक्या असलेली छोटी बुकिंग ऑफिस होणे आवश्यक आहे. ठाणे स्टेशनात प्लँटफाँर्म नं ७ ते १० वर कोठेही लिफ्ट अथवा एस्कलेटर बसवलेले नसल्याने जीने चढून जावे. लागते. ह्यास्तव प्लँटफाँर्म नं. ७/८ वर लिफ्ट बसवण्याची व प्लँटफाँर्म नं.९ वर लिफ्ट तसेच एस्कलेटर बसवण्याची आवश्यकता आहे. प्लँटफाँर्म ५/६ च्या रूंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. सर्व प्लँटफाँर्म च्या दोन्ही टोकांना टोयलेट्स बांधणे आवश्यक आहे. एक्स्प्रेस गाडयांनी ठाणे स्टेशनात उतरून पुढे लोकलने उपनगरीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोईसाठी प्लँटफाँर्म नं ५/६ व ७/८ वर प्रत्येक जीन्या जवळ उपनगरीय तिकीट काढण्यासाठी एटीव्हीएम मशीन बसवावीत. प्लँटफाँर्म नं चार वरील मुंबई दिशेला असलेला S-59 हा सिग्नल प्लँटफाँर्मच्या मुंबई कडील टोकाला shift करणे व त्या योगे लोकल ३ डबे अधिक पुढे उभी करणे. मुंबई - ठाणे -- मुंबई लोकलची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. ट्रान्सहार्बर वर ठाणे - पनवेल - ठाणे लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

ठाणे - नेरूळ लोकलचा विस्तार उरण पर्यंत करून, ठाणे - उरण - ठाणे थेट लोकल सुरू होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे वडाळा येथे आरक्षणने पनवेल - गोरेगाव लोकल चालवल्या जातात, त्याच पध्दतीने ठाणे येथे आरक्षणने वाशी/पनवेल ते कल्याण/कसारा/कर्जत दरम्यान थेट लोकल फेऱ्या सुरू करणे. त्यासाठी ठाणे स्टेशन व कळवा खाडी दरम्यान आवश्यक ते क्रॉसओव्हर बसवणे. मुंबई - नांदेड राज्य राणी एक्सप्रेसचा ठाणे स्टेशनातील टेक्निकल हॉल्ट हा पँसेंजर हाँल्ट करावा. ठाणे महानगरातील, विक्रोळी ते दिवा दरम्यानच्या संपूर्ण ट्रान्सहार्बर मुळे नवी मुंबईतील प्रवाशांच्या सोईसाठी डेक्कन क्विन, राजधानी एक्स्प्रेस व दुरांतो एक्सप्रेस ह्या गाड्या सोडून सर्व थेट गाड्या ठाणे स्टेशनात थांबवणे. नाहूर यथील गुड्स यार्ड हल्ली फारसा वापरात नाही, त्यामुळे तेथे प्रवासी गाड्यांसाठी आवश्यक त्या सोई निर्माण करून, ह्या यार्डाचा उपयोग करून ठाणे स्टेशनातून काही एक्सप्रेस गाड्या चालवणे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख, प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, सरचिटणीस विलास साठे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी, नम्राता कोळी इत्यादींसह नीलेश कोळी, श्रुतिका मोरेकर, अमरीश ठाणेकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे