शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी पथकाचा पाच हजार फुकट्या महिला प्रवाशांना दणका, १३ लाख १८ हजारांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 07:44 IST

Mumbai Suburban Railway : महिलांच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात महिला टीसींच्या तेजस्विनी पथकाची १७ ऑगस्ट, २००१ला स्थापना करण्यात आली आहे.

डोंबिवली : विनातिकीट, नियमानुसार तिकीट अथवा पास न काढता प्रवास करणाऱ्या ५ हजार ११९ महिला प्रवाशांना मध्य रेल्वेच्या ‘तेजस्विनी’ या महिला टीसींच्या पथकाने दणका दिला आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत केलेल्या कारवाईत या पथकाने या फुकट्या प्रवाशांकडून १३ लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.महिलांच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना चाप लावण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात महिला टीसींच्या तेजस्विनी पथकाची १७ ऑगस्ट, २००१ला स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने मागील वर्षी फुकट्या प्रवाशांकडून दोन कोटी ७५ लाख रुपयांच्या दंडवसूल केला होता, तर यंदा आतापर्यंत ३ कोटी ४३ लाखांचा दंडवसूल केला असून, सुमारे ६८ लाख रुपये जास्तीचे वसूल केले आहेत. मागील वर्षी एक लाख १७ हजार केसच्या तुलनेत या वर्षी एक लाख २४ हजार केसची नोंद केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सात हजार जास्तीच्या केस दाखल केल्या आहेत.तेजस्विनी पथकाकडून केल्या जाणाऱ्या तिकीट तपासणीमुळे गेल्या काही वर्षांत अतिरिक्त भाड्याच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. 

भिकाऱ्यांचा त्रास कमीतेजस्विनी पथकाच्या कारवाईमुळे महिलांच्या डब्यांमध्ये फेरीवाले, भिकारी इत्यादींमुळे होणारा त्रास कमी झाल्याचा दावा रेल्वेने केला. क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या अनेक महिला तिकीट तपासनीस कर्मचारी या पथकात आहेत. त्या व्यावसायिक, तसेच क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करत असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेWomenमहिलाdombivaliडोंबिवली