शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

तिकीट विचारल्याने टीसीला केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:42 IST

गुप्ता हे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये टीसी म्हणून कर्तव्यावर होते. मुंबईहून ही गाडी कल्याणकडे जात असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : गोंदियाकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसमधील एका प्रवाशाने टीसीला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. टीसीने प्रवाशाला तिकीट विचारल्यावर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी प्रवाशाने टीसीला शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी विजयन पेरूमल (३४, रा. कल्याण) या प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे, तर राजेशकुमार गुप्ता (४२), असे मारहाण झालेल्या टीसीचे नाव आहे.

गुप्ता हे विदर्भ एक्स्प्रेसमध्ये टीसी म्हणून कर्तव्यावर होते. मुंबईहून ही गाडी कल्याणकडे जात असताना प्रत्येक डब्यातील प्रवाशाचे तिकीट ते तपासत होते. डोंबिवली स्थानकातून गाडी कल्याणच्या दिशेने जात असताना पेरूमल याला गुप्ता यांनी तिकीट विचारले. त्यावेळी पेरूमल याने माझ्याकडे तिकीट होते. मात्र, ते हरवल्याचे गुप्ता यांना सांगितले. त्यामुळे त्यांनी पेरूमल यास दंड भरण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी इतर प्रवाशांनी मध्यस्थी करीत मारहाणीचा प्रकार रोखला. गाडी कल्याण स्थानकात थांबून काही वेळातच पुढील प्रवासास निघाली.

डोबिंवली पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग याप्रकरणी गुप्ता यांनी मनमाड लोहमार्ग पोलीस ठाण्यात पेरूमलविरोधात तक्रार दिली. मात्र, मारहाणीचा प्रकार डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचा हद्दीत घडल्याने हा गुन्हा त्यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.

 

टॅग्स :thaneठाणेlocalलोकलMumbaiमुंबई