शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

विद्यार्थ्यांनी देश उभारणीत योगदान द्यावे: केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

By अनिकेत घमंडी | Updated: October 18, 2022 15:17 IST

छत्रपती शिक्षण संस्थेच्या १० हजार विद्यार्थ्यांनी लिहिली पंतप्रधानांना "धन्यवाद पत्र"

कल्याण (प्रतिनिधी) आपल्या देशाला मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला असून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवून देश उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.  

छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्यामंदिर शाळेत झालेल्या धन्यवाद मोदी उपक्रमात कपिल पाटील बोलत होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष एन के फडके, भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, संस्थेच्या चिटणीस मीनाक्षी गागरे, भारती वेदपाठक, संस्थेचे मार्गदर्शक बाबा जोशी, माजी सरचिटणीस मनोहर ठाकुरदेसाई, कार्यकारणी सदस्य किशोर आल्हाट, भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, मुख्याध्यापक संपत गीते आदी उपस्थित होते.

पुढील २० वर्षाचा वेध घेत देशाला नवीन शैक्षणिक धोरण मिळाले, देशातील शाळा अद्ययावत व्हाव्यात यासाठी देशभरातील १४ हजाराहून अधिक "पीएम श्री शाळा" करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून शिक्षणाच्या माध्यमातून देशाला महासत्ता बनविण्याचे पंतप्रधानांनी ठरविले असल्याचे कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद करतांना सांगितले.  छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ नंदकिशोर जोशी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिक्षण संस्था नागरी, सागरी तसेच वनवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करीत असून अनेक अडचणींवर मात करून संस्थेच्या विविध शाळांमधील विद्यार्थी विविध क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवीत असल्याचे डॉ नंदकिशोर जोशी यांनी सांगितले.

अनिल बोरनारे यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात पत्रे लिहून पंतप्रधानांना पोहचविण्याचे भाजपाचे धन्यवाद, मोदीजी अभियान सुरू केले आहे. छत्रपती शिक्षण संस्थेच्या  पुढाकाराने शैक्षणिक लाभार्थी विद्यार्थ्यांचे पत्र लिहिण्याचा उपक्रम सुरू केला असून छत्रपती शिक्षण मंडळातील विविध शाळांमधील सुमारे १० हजार विद्यार्थी व इतर शाळांमधील २ हजार विद्यार्थ्यांनी मोदींजींना पत्रे लिहिली ही पत्रे एका व्हॅन ने प्रदेश कार्यालयाला पाठविली जाणार असून त्या व्हॅन ला हिरवा झेंडा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दाखविला. 

लवकरच ठाणे जिल्ह्यातून अजून २५ हजार पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थी लिहिणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य एन के फडके तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संपत गीते यांनी मांडले. संस्थेचे सरचिटणीस डॉ निलेश रेवगडे व इतर पदाधिकाऱ्यांचे या कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील