शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत निघालेल्या मायलेकीवर कोसळला इमारतीचा सज्जा; कल्याणमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 11:30 IST

या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: शहराच्या पश्चिम भागातील मुस्लीम बहुल वस्तीतील मौलवी कम्पाउंड येथील अतिधोकादायक इमारतीच्या सज्जाचा काही भाग शनिवारी दुपारी कोसळला. या घटनेत एक मुलगी आणि तिची आई जखमी झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या धोकादायक इमारतीमधील नागरिकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मौलवी कम्पाउंड ही धोकादायक इमारत आहे.

या इमारतीला पालिकेने यापूर्वीच नोटीस दिली आहे. एक इमारत तळ अधिक चार मजली आहे. तर दुसरी इमारत तळ अधिक एक मजली आहे. या इमारतीत ७५ घरे आहेत. या ठिकाणी बहुतांश रहिवासी भाडेकरू आहेत. दुपारी तळ अधिक चार मजली असलेल्या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरचा सज्जा कोसळला. इमारतीच्या खालून जात असलेल्या मेहरुनिसा आणि त्यांची मुलगी तस्मिया या जखमी झाल्या. मेहरुनिया या तस्मिया हिला शाळेत घेऊन जात होत्या. तस्मिया हिच्या पायाला, तर मेहरुनिसा हिच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, सहायक आयुक्त सविता हिले, प्रीती गाडे, आयुक्तांचे सचिव उमेश यमगर आदींनी त्याठिकाणी धाव घेतली. 

संक्रमण शिबिरे नाहीत

गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे घटना घडली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळ्यात महापालिका हद्दीतील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीतील नागरिक जीव मुठीत धरून जगत असतात.

धोकादायक इमारतीमधील नागरिकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात. मात्र, त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठीमहापालिकेकडे पुरेशी संक्रमण शिबिरे नाहीत.

उपायुक्त जाधव यांनी सांगितले की, येथील ७५ कुटुंबीयांना अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याण