शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

१७ वर्षांपासून सुरू असलेले मेगाहाल थांबवा; रेल्वेमंत्र्यांना प्रवासी संघटनांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 10:01 IST

दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : दररोज रेल्वेने प्रवास करताना चाकरमान्यांचे हाल होतात. रविवारी सुट्टीच्या दिवशी कुटुंबासह बाहेर पडल्यानंतरही त्यांना डबल हाल सहन करावे लागतात. १७ वर्षांपासून मेगाब्लॉकमुळे होणारे हे मेगाहाल आता असह्य होत आहेत. त्यामुळे उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी रविवारचा मेगाब्लॉक रद्द करून पूर्ण क्षमतेने रेल्वेसेवा द्यावी, अशी मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. 

दोन्ही रेल्वे मार्गांवर सुमारे ७५ लाख रेल्वे प्रवासी प्रतिदिन प्रवास करतात. त्यापैकी ४५ लाख मध्य रेल्वेचे प्रवासी असून, त्यातही ठाणे जिल्ह्यातून सुमारे २१ लाख प्रवासी मुंबईत जातात. तर पश्चिम रेल्वेचे सुमारे ३१ लाख प्रवासी असतात. मेगाब्लॉकचा ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना सर्वाधिक फटका बसत असतो. कल्याण ते कसारा, कर्जतच्या प्रवाशांना त्याचा त्रास होतो. शहरातील प्रवासी अन्य पर्यायाने पुढे जातात. परंतु ग्रामीण भागातील प्रवासी मात्र रेल्वेशिवाय प्रवास करू शकत नाहीत. परिणामी सर्व स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यात लोकल फेऱ्यांची कपात केल्यामुळे प्रवासी ठिकठिकाणी स्थानकात ताटकळतात. त्यात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींचे हाल होतात. 

अंमलबजावणी अशक्य  रेल्वेच्या म्हणण्यानुसार, देखभाल करण्यासाठी ब्लॉक घ्यावाच लागतो. त्यातून रुळांची देखभाल, सिग्नल यंत्रणा, रेल्वे फलाट, ओव्हर हेड वायर, लोकल डबे, क्रॉसिंग, खडी यांसह अन्य तांत्रिक देखभाल दुरुस्ती आदी कामे करावी लागतात, ती कामे अन्य दिवसात करता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी जरी मागणी केली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, ती मागणी फारशी रास्त नाही, असेही एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दररोज लोकल फेऱ्या n मध्य रेल्वे मुंबई ते कसारा १२० किमी, मुंबई ते कर्जत १०० किमी, खोपोली सुमारे ११४ किमी असा मार्ग आहे. पनवेलपर्यंत ६६ किमी असा मार्ग आहे. n पश्चिम रेल्वेवर चर्चगेटपासून विरारपर्यंत सुमारे ६० किमीचा डहाणूपर्यंत १२४ किमीचा रेल्वे मार्ग आहे. या दोन्ही मध्य रेल्वेवर प्रतिदिन सुमारे १८१० लोकल फेऱ्या, पश्चिम रेल्वेवर १३९४ लोकल फेऱ्या दुतर्फा धावतात.n साधारणपणे मुंबई-कसारा ३७ रेल्वे स्थानके, कर्जतपर्यंत ३५, खोपोलीपर्यंत ४० स्थानकांचा समावेश आहे. पनवेलपर्यंत ३१ आणि त्यापुढे रोहापर्यंत ४१ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 

टॅग्स :localलोकल