शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्पीड ब्रेकर देतायत अपघातांना निमंत्रण; दुचाकीचालक आणि पादचारी गंभीर जखमी

By प्रशांत माने | Updated: August 18, 2023 17:55 IST

यश कोंडालकर (वय १८) असे जखमी दुचाकीस्वाराचे तर खोकन माजी (वय ४५) असे जखमी पादचारी व्यक्तीचे नाव आहे.

डोंबिवली : येथील एमआयडीसी, निवासी भागातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी टाकण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरवर दुचाकी आदळुन झालेल्या अपघातात त्यावरील चालक आणि आणि पादचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. नव्याने टाकलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारले नव्हते. यात स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.

यश कोंडालकर (वय १८) असे जखमी दुचाकीस्वाराचे तर खोकन माजी (वय ४५) असे जखमी पादचारी व्यक्तीचे नाव आहे. दोघांना उपचारार्थ खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. डॉ नानासाहेब धर्माधिकारी रोडवरील ओमकार शाळा आणि कोयना सोसायटीजवळ नव्यानेच स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. अपेक्षेपेक्षा जास्त उंच असलेल्या स्पीड ब्रेकरवर पाढंरे पट्टे मारले गेले नव्हते. यात सकाळी दुचाकीवरून चाललेल्या यशला त्या स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही आणि त्याची दुचाकी त्या स्पीड ब्रेकरवर आदळुन काही अंतरापर्यंत घसरत गेली. त्या घसरलेल्या दुचाकीची ठोकर तेथून चालत जाणा-या खोकन यांना बसली. या अपघातात दोघांना गंभीर मार लागला आहे. दरम्यान गुरूवारी रात्री देखील अन्य एक दुचाकीस्वार संबंधित स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने खाली पडून जखमी झाल्याची माहीती स्थानिकांनी दिली. स्पीड ब्रेकर बांधताना ते नियमानुसार असावेत याकडे येथील रहिवाशी राजू नलावडे यांनी लक्ष वेधले आहे. अपघात घडताच मारले पांढरे पट्टेसंबंधित रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएमआरडीए विभागाने केले आहे. त्या रस्त्यावर नुकतेच स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. दोन दिवसात घडलेले अपघात पाहता रस्ता बनविणा-या कंत्राटदाराला बोलावून घेतले आणि त्याच्याकडून स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारून घेण्यात आले अशी माहीती मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीAccidentअपघात