शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीतील ‘ती’ बांधकामे रडारवर! अधिकाऱ्यांना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 00:32 IST

KDMC News : केडीएमसी हद्दीत २८३ धोकादायक, तर १८१ अतिधोकादायक, अशा ४६४ इमारती धोकादायक आहेत. मागील वर्षी हीच संख्या ४७३ होती.

 डोंबिवली : पश्चिमेतील ४० वर्षे जुनी आणि अतिधोकादायक ‘महेश भुवन’ इमारतीच्या गॅलरीचे प्लास्टर शुक्रवारी कोसळले. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धोकादायक बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर होणाऱ्या धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणानंतर संबंधित बांधकामांवर तातडीने कारवाई अपेक्षित असते. परंतु, नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर का होईना केडीएमसीला जाग आली असून, आता अतिधोकादायक इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. मनपा त्यासाठी पोलिसांचीही मदत घेणार आहे.केडीएमसी हद्दीत २८३ धोकादायक, तर १८१ अतिधोकादायक, अशा ४६४ इमारती धोकादायक आहेत. मागील वर्षी हीच संख्या ४७३ होती. धोकादायक बांधकामांवर कारवाई सुरू असल्याचा दावा केडीएमसी दरवर्षी करते. मात्र, प्रभावीपणे कारवाई होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही जुन्या आणि जीर्ण अवस्थेतील बांधकामांना स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस मनपाकडून बजावली जाते, पण पुढे खरेच ऑडिट होते का, हाही संशोधनाचा विषय आहे.एकीकडे जीव मुठीत घेऊन रहिवाशांना राहावे लागत असले तरी धोकादायक बांधकामांवरील कारवाई रोखण्यात बहुतांश वेळा तेच कारणीभूत ठरतात. पुनर्वसन होत नाही तोपर्यंत घरे रिकामी न करण्याचा त्यांचा पवित्र असतो. मालक-भाडेकरू वाद हा मुद्दाही कारवाईत अडथळा ठरतो. काही बांधकामांचे वाद हे न्यायप्रविष्ट असल्याने अशांवर कारवाई करता  येत नाही.   

‘क’ प्रभागात १०२ बांधकामे धाेकादायकसर्वाधिक १०२ अतिधोकादायक बांधकामे कल्याणमधील ‘क’ प्रभागात आहेत. त्याखालोखाल ‘ग’ प्रभागात ३२, ‘फ’ प्रभागात १६ बांधकामे आहेत. ‘ह’ प्रभागात ११, ‘ब’ प्रभागात १०, ‘ड’मध्ये सहा, ‘अ’ व ‘जे’ प्रभागात प्रत्येकी दोन तर ‘आय’ आणि ‘ई’ प्रभागात एकही अतिधोकादायक बांधकाम नाही. 

अतिधोकादायक इमारती तोडण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जेथे रहिवास नाही ती तोडली जाणार आहेत, तसेच ज्या बांधकामांमध्ये रहिवास आहे तेथे पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. - सुधाकर जगताप, उपायुक्त, बेकायदा बांधकाम नियंत्रण विभाग 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका