शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्या " सोसायटीने मानले "लोकमत"चे आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:14 IST

Kalyan News: कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्वेकडील  100 फिट रोड परिसरात असलेल्या काही सोसायट्यांची समस्या  "लोकमत" ने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली होती.

कल्याणकल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पूर्वेकडील  100 फिट रोड परिसरात असलेल्या काही सोसायट्यांची समस्या  "लोकमत" ने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली होती. अखेर या लोकमतच्या  वृत्ताची दखल घेतली गेली असून  या परिसरात असलेल्या खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे.  काम सुरू झाल्याची माहिती येथील नागरिकांनी लोकमतला दिली असून याबाबत "लोकमत समूहाचे" अभार देखील मानले आहे.

9  जून रोजी कल्याण डोंबिवली परिसराला मुसळधार  पावसाने  झोडपले. अनेक ठिकाणी पाणी  साचले. कल्याण पूर्वेतील 100 फिट रोड परिसरात असलेल्या काही सोसायट्यांचा परिसर जलमय झाला होता. रस्ते खराब असल्याने या  ठिकाणी असलेल्या खड्ड्यात पाणी साचले होते. येथून मार्गस्थ होण्यासाठीही नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. अक्षरशः एका ग्रामीण भागातील परिसरापेक्षा  येथील अवस्था  बिकट होती. याबाबत नागरीकांनी लोकमतशी संपर्क साधून व्यथा  मांडली. त्यानंतर "लोकमत"ने ही सर्व परिस्थिती  थेट फेसबुक  लाईव्हच्या माध्यमातून मांडली. 

 अखेर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याची दखल  घेत  रस्त्याची डागडुजी करण्यास सुरुवात केली असल्याचे  कृष्णा हाईट्स या  सोसायटीत राहणारे नागरिक अशोक कालसप्रे यांनी सांगितले. तसेच  पावसाळा संपला की या ठिकाणी पक्का रस्ता करून देण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे ते म्हणाले. लोकमत हे तुमच्या हक्काचे व्यासपीठ आहे . तुमच्या परीसरातील समस्या आमच्यापर्यंत नक्की पोहचवा. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण