शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्लीत सिग्नलच्या केबल तुटल्या,  कॉशन ऑर्डरवर लोकल सुरू; वेग मंदावला

By अनिकेत घमंडी | Updated: January 8, 2024 14:52 IST

या घटनेचा परिणाम अप/ डाऊन जलद धीम्या चारही लाईनवर झाला. त्यामुळे दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंतच्या लोकलचे वेळापत्रक प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात आले.

डोंबिवली: मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डाऊन दिशेकडील भागात सिग्नलच्या केबलला जेसीबीचा धक्का लागल्याने त्या तुटल्याची घटना सोमवारी दुपारी दोन वाजता घडली, त्यामुळे काही वेळ लोकल खोळंबल्या होत्या. त्यांनंतर कॉशन ऑर्डरवर त्या सुरू झाल्या, परंतु लोकलचा वेग मंदावला होता.हा अपघात घडल्याने जेसीबीचे काम काही वेळ बंद करण्यात आले. डोंबिवलीच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत संगितले की, कल्याणकडे जाणाऱ्या डाऊन दिशेकडील रेल्वे मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे काहीकाळ सर्वत्र रेड सिग्नल आला, मात्र त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर निर्णय आल्यानंतर तेथील वाहतूक कोशन ऑर्डरवर सुरु केली. त्या घटनास्थळी ताशी ३० किमी किंवा त्याहून कमी वेगाने लोकल पुढे धावल्या.

या घटनेचा परिणाम अप/ डाऊन जलद धीम्या चारही लाईनवर झाला. त्यामुळे दुपारनंतर संध्याकाळी उशिरापर्यंतच्या लोकलचे वेळापत्रक प्रभावित होणार असल्याचे सांगण्यात आले. तो बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे रेल्वेची सिग्नल यंत्रणा महत्वाची असून केबलची सुरक्षा जपणे महत्वाचे आहे, जेसीबी तेथे कसा आला? काय काम सुरू होते, त्या कामादरम्यान केबल आहे याबाबतची माहिती संबंधित कंत्राटदार, जेसीबी चालकाला नव्हती का आदी सवाल प्रवाशांनी विचारले. त्यावरून डोंबिवली, ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती, रेल्वेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वे