शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मलंगगडावर शिंदे-ठाकरे गटाचे शक्तिप्रदर्शन; भाविकांची लोटली गर्दी, महाआरतीची परंपरा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:34 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले.

कल्याण : माघ पौर्णिमेच्या निमित्ताने रविवारी मलंगगडावर हिंदू भाविक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी उसळली होती. दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेत पूजा आणि महाआरती केली. शिवसेना दुभंगल्यावर साजरा होणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने ठाकरे-शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन मलंगगडावर पाहायला मिळाले.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने १९८२ पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. माघ पौर्णिमेची महाआरतीची परंपरा अविरत सुरू असून कोरोनानंतर झालेल्या या उत्सवात भाविकांचा मोठा उत्साह होता. श्री मलंगगडावर जाऊन शिंदे यांनी श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, गोपाळ लांडगे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते. आनंद दिघे यांनी मलंग उत्सवाला सुरूवात केली. त्यांनी सुरू केलेले उपक्रम, कार्य यापुढेही सुरू ठेवू, मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच मलंगगडावर येण्याचे भाग्य लाभले. गेल्या सहा महिन्यांत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. राज्यात कोविडमुळे निर्बंध घातले गेले होते. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण, उत्सव मोठ्या जोमात साजरे करण्यात येत आहेत. सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करत आहोत. राज्यात सर्वसामान्यांना न्याय देणारे सरकार कार्यरत आहे. देशात सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविण्यात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या माध्यमातून विकासात योगदान देण्याचे काम करत आहोत, असे म्हणाले. फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होईल, असा दावाही शिंदेंनी केला. 

दानवे, विचारे, दिघेंची उपस्थितीखासदार राजन विचारे,  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर, रूपेश म्हात्रे, विजय साळवी यांच्यासह मोठ्या संख्येने ठाकरे गटातील जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मलंगगडावर उपस्थिती लावली होती. 

फ्युनिक्युलर ट्रॉलीकरिता पुढाकार घ्यागेल्या १५ वर्षापासून फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम रखडले आहे. अनेक वर्षे शिंदे पालकमंत्री असूनही ते काम अद्याप मार्गी लागलेले नाही. मुख्यमंत्री म्हणून आता संधी मिळाली आहे. लवकरात लवकर हे काम त्यांनी मार्गी लावावे. केवळ शिवसैनिकांना त्रास देण्याचे काम करू नका. केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. गेली ३९ वर्षे मलंगमुक्तीसाठी हिंदूंची वहिवाट चालू आहे. त्यासाठीही शिंदेंनी पुढाकार घ्यावा, असे खासदार विचारे यांनी सांगितले.  

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना