शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण पूर्वेत भाजपला धक्का, भाजप महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

By मुरलीधर भवार | Updated: November 6, 2023 13:39 IST

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. 

मुरलीधर भवार-कल्याण: कल्याणमध्ये भाजप आणि शिंदे गटात धूसफूस सुरु असताना शिवसेना शिंदे गटाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. कल्याण पूर्वेतील दाेन भाजपच्य महिला पदाधिकाऱ््यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोन्ही महिलाला पदाधिकाऱ््यांना पक्षात नवी जबाबदारी देण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख निलेश शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. 

कल्याण लोकसभेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये धूसफूस सुरु आहे. काही दिवसापूर्वीच कल्याणमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घरी आले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशीसह अन्य नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे व्यथा मांडली होती. कशा प्रकारे विकास कामात त्यांना प्रशासनाकडून डावलले जात आहे. हे सांगितले होते. या आधी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात देखील आरोप प्रत्याराेप झाले होते. दोन्ही कडून एकमेकांच्या विरोधात टिका करण्यात आली होती. कल्याण पूर्वेत या दोन्ही पक्षात आलबेल नाही. हे वारंवार दिसून येते. हे सर्व सुरु असताना कल्याण पूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकरी निलेश शिंदे आणी माजी नगरसेविका माधूरी काळे यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजप जिल्हा महिला सचिव निता चव्हाण यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या मेहरुम शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. रविवारी संध्याकाळी निलेश शिंदे, माधूरी काळे, पुष्पा ठाकरे यांच्या उपस्थिती निता चव्हाणसह मेहरुम शेख यांनी शिदे गटात प्रवेश केला. निता चव्हाण यांना शहर संघटक पदाची जबाबदारी दिली आहे. तर शेख यांना विधानसभा संघटक पदाची जबाबदारी सोपविली आहे. निता चव्हाण या भाजपच्या महिला मोर्चाच्या सचिव होती. शिंदे गटात प्रवेश केल्यावर त्यानी पक्ष बांधणीकरीता चांगले काम करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका