शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शिवशेतपाडा प्रकाशला; पंधरा घरांमध्ये दीपावली साजरी

By अनिकेत घमंडी | Updated: November 28, 2023 16:47 IST

येथील आदिवासी बांधवांनी आनंदाने दिवाळीनंतरही विजेच्या प्रकाशात पुन्हा दीपावली साजरी केली. 

महावितरणच्या शहापूर उपविभागीय कार्यालयांतर्गत शिवशेत या आदिवासी पाड्यातील पंधरा घरांमध्ये सोमवारी (२७ नोव्हेंबर) रात्री प्रकाश पोहचला. महावितरणने पायाभूत सुविधा उभारत विखुरलेल्या व दुर्गम भागातील १५ घरांना नवीन वीजजोडणी दिली आणि येथील आदिवासी बांधवांनी आनंदाने दिवाळीनंतरही विजेच्या प्रकाशात पुन्हा दीपावली साजरी केली. दुर्गम भागात विखुरलेली घरे असल्याने वीजपुरवठा करण्याचे काम आव्हानात्मक होते. गोपाळपाडा गावाला वीजपुरवठा करणाऱ्या रोहित्रापासून लघुदाब वाहिनीचे चार खांब उभारून ३ घरांना नवीन वीजजोडणी देण्यात आली. तर बेहरेपाडा येथील रोहित्रापासून १६ लघुदाब वाहिनीचे खांब उभारून १२ घरांची जोडणी कार्यान्वित करण्यात आली.शिवशेत पाड्यातील १५ घरांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी एकूण २० खांब उभारून एक किलोमीटर लघुदाब वाहिनी टाकण्यात आली. वीज पुरवठ्याच्या मागणीनंतर युद्धस्तरावर काम पूर्ण करून महावितरणने वीजजोडणी दिल्याचा आनंद शिवशेत पाड्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. दिवाळीनंतरच्या आठवडाभरात सोमवारी रात्री प्रकाश पोहचल्यानंतर शिवशेत पाडा येथील आदिवासी बांधवांनी अक्षरश: पुन्हा एकदा दीपावली साजरी करत महावितरणला धन्यवाद दिले.कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ग्रामीणचे कार्यकारी अभियंता विनय काळे, शहापूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश मालखेडे, खर्डी शाखेचे शाखा अभियंता सुरेश राठोड आणि कंत्राटदार प्रकाश भोईर यांच्या टिमने शिवशेतपाडा प्रकाशमान करण्याची कामगिरी यशस्वी केली.

टॅग्स :dombivaliडोंबिवली