शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंच्या विरोधात शिवसेनेची घोषणाबाजी; उडवलेल्या कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक पोलीस यांच्यात झटापट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 13:32 IST

सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही असे स्पष्ट केले.

डोंबिवली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राज्यभरात निषेधाचे पडसाद उमटले. डोंबिवली शहर शिवसेना शाखेच्यावतीने कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, युवासेना सागर जेधे, राहुल म्हात्रे आदींसह शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौकात कोंबड्या उडवून नारायण राणेंचा निषेध केला. 

यावेळी कोंबड्या पकडण्यासाठी शिवसैनिक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. जेधे यांनी राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पण तो पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर आणखी एक पुतळा शिवसैनिकांनी आणला खरा पण तो फाडण्यात आला. त्यावर राणेंची छबी होती. त्या छबीला फाडण्यात आले. 

सदानंद थरवळ यांनी जमावाला आवाहन करताना राणेंच्या वक्तव्याचे अजिबात समर्थन नाही असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान खपवून घेतले जाणार नाही असे त्यांनी सांगितले. वैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीवर असे व्यक्तव्य करू नये तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील त्यांनी केली. 

पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. राणे यांनी डोबिंवलीत पाऊल ठेवू नये, ठेवल्यास त्यांच्या स्वागताची तयारी केली जाईल असे खुले आव्हान शिवसेना महिला शहर आघाडी, रणरागिणी कविता गावंड, वैशाली दरेकर, मंगला सुळे आदींनी केले. मोरे, जेधे आदींना रामनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे