शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटीच्या खंडणीसाठी शाळकरी मुलाचे अपहरण! मुलाची सुखरूप सुटका; चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:07 IST

शाळेत सोडणा-या रिक्षाचालकानेच रचला कट

डोंबिवली: दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची मानपाडा पोलिसांनी साडेतीन तासात शहापूर परिसरातून सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. महत्वाचे म्हणजे शाळेत सोडणा-या रिक्षाचालकानेच हा अपहरणाचा कट रचल्याचे पोलिस चौकशीत उघड झाले आहे. विरेन पाटील असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

पुर्वेकडील रिजेन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारे बांधकाम व्यावसायिक महेश भोईर यांचा इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेत शिकणारा मुलगा कैवल्य (वय ७) हा शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेसाठी नेण्यासाठी येणा-या नेहमीच्या रिक्षातून निघाला. दरम्यान सकाळी ९ च्या सुमारास रिक्षाचालक विरेन पाटील याच्या मोबाईलवरून महेश यांना व्हॉटसअप कॉल आला. एका अनोळखी व्यक्तीने त्यावर संवाद साधत तुमच्या मुलाचे रिक्षाचालकासह अपहरण केले आहे दोन कोटी रूपये दयावे लागतील पोलिसांना कळविल्यास दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान महेश यांची पत्नी कोमल हिने लागलीच मानपाडा पोलिस ठाणे गाठत याप्रकरणी तक्रार दिली. चिमुकल्याच्या अपहरणाच्या प्रकाराबाबत पोलिस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली मुलाच्या शोधासाठी पाच पथके नेमली होती.

अपहरणाचा बनाव झाला उघड

महत्वाचे म्हणजे मुलाला शाळेत ने-आण विरेन आणि त्याचा भाऊ करायचा. सलग येणारा विरेनचा भाऊ शुक्रवारी आला नाही. विरेन शाळेत नेण्यासाठी आला. विरेनच्या मोबाईलवरून व्हॉटसअप कॉल करून खंडणी मागितली जात असल्याने पोलिसांचा विरेनवर संशय बळावला. विरेनच्या भावाला देखील चौकशीकामी पोलिस ठाण्यात आणले होते. दरम्यान संबंधित मोबाईल ट्रेस करत पोलिसांची पथके शहापुर परिसरात पोहोचली आणि रिक्षाच्या नंबरवरून तीचा शोध घेत कैवल्यची अवघ्या साडेतीन तासात सुखरूप सुटका केली. महत्वाचे म्हणजे चौकशीत रिक्षाचालक विरेन यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले.आणखीन आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता

चार आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये आणखीन काही आरोपींचा सहभाग असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.पोलिसांचे मानले धन्यवादकैवल्य याची सुखरूप सुटका केल्याबद्दल त्याचे वडील महेश यांनी मानपाडा पोलिस प्रशासनाचे धन्यवाद मानले आहेत.