शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणुकदारांचे दागिने, भिशीचे पैसे लाटणारा भामटा सराफ अखेर गजाआड

By प्रशांत माने | Updated: May 19, 2023 14:20 IST

ठाकूर्ली रेल्वे स्टेशन समोर सोहनसिंहचे महालक्ष्मी ज्वेलर्स नामक दुकान होते.

डोंबिवली: सर्वसामान्य नागरीकांकडून भिशीच्या नावाने पैसे आणि गहाण ठेवलेले व बनविण्यासाठी दिलेले दागिने घेऊन पसार झालेल्या सोहनसिंह चैनसिंह दसाना (वय ५२) या भामटया सोनाराला रामनगर पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे सहा महिन्यापासून सोहनसिंह आपल्या घरातील एका रुममध्ये बाहेरुन टाळे ठोकत लपून राहत होता. तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ठाकूर्ली रेल्वे स्टेशन समोर सोहनसिंहचे महालक्ष्मी ज्वेलर्स नामक दुकान होते.

नागरीकांकडून विश्वासाने दागिने घेवून त्या मोबदल्यात कर्ज देतो असे सांगत, तसेच दागिने बनविण्यासाठी आगावू रकमा घेवून, कोणतेही दागिने बनवून न देता घेतलेली रक्कम तसेच दागिने घेवून सहा महिन्यांपूर्वी सोहनसिंह पसार झाला होता. त्याने भिशीच्या माध्यमातूनही मोठया प्रमाणात दागिने आणि पैसे ही नागरीकांकडून घेतले होते. अचानक त्याच्या ज्वेलर्स दुकानाला टाळे असल्याचे दिसून आले. जेव्हा गुंतवणूकदारांनी सोहनसिंहला फोन करण्यास सुरुवात केली असता सातत्याने त्याचा फाेन बंद असल्याचे आढळून आले.

आजुबाजुला चौकशीअंती अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित १६ गुंतवणुकदारांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत सोहनसिंह विरोधात तक्रार दिली होती. गुंतवणुकदारांची एकुण ३१ लाख ५३ हजार २२० (रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने ) रूपयांची फसवणूक झाली होती. या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे ) समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश सानप, पोलिस हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, निलेश पाटील, निसार पिंजारी यांचे पथक नेमले होते.पत्नीने दिली खोटी माहीती

पोलिसांचे पथक तांत्रिक तपासाच्या आधारे राजस्थान येथील थुरावड बरकडा की भागल या गावात पोहचले. सोहनसिंहच्या घराचा ठावठिकाणा शोधत पोलिस त्याच्या घरीही पोहोचले. पण सहा महिन्यांपासून ते आमच्या संपर्कात नाहीत अशी खोटी माहीती सोहनसिंहच्या पत्नीने पोलिसांना दिली. परंतू पोलिसांना सोहनसिंग हा घरातच असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली होती. तो घरातील एका खोलीला बाहेरुन कुलुप लावून आतमध्ये लपून राहतो असेही समजले होते. अखेर पोलिसांनी घरात घुसून कुलुपू तोडत त्याला ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी