शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर मनसेच्या अध्यक्षपदी संजय घुगे; राज ठाकरेंनी केली नियुक्ती

By सदानंद नाईक | Updated: December 4, 2023 14:22 IST

उल्हासनगर दौऱ्यावेळी टॉउन हॉल येथील एका कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ६ महिन्यांपूर्वी शहर कार्यकारणी बरखास्त करून पक्ष पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता.

उल्हासनगर : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी उल्हासनगर शहाराध्यक्षपदी संजय घुगे यांची सोमवारी नियुक्ती केली. तसेच सचिन बेंडके, मुकेश सेजपालनी, रवी पाल, सागर चव्हाण व शैलेश पांडव यांची उपशहर अध्यक्ष तर ऍड अनिल जाधव यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उल्हासनगर दौऱ्यावेळी टॉउन हॉल येथील एका कार्यक्रमात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी ६ महिन्यांपूर्वी शहर कार्यकारणी बरखास्त करून पक्ष पदाधिकाऱ्यांना धक्का दिला होता. तसेच एका आठवड्यात नवीन शहाराध्यक्षसह अन्य पदाधिकार्यांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या सहा महिन्यापासून शहाराध्यक्ष पदासह अन्य पदाधिकर्यांच्या नियुक्तीला मुहूर्त मिळाला नव्हता. अखेर सोमवारी माजी शहरजिल्हाध्यक्ष संजय घुगे यांची पुन्हा शहाराध्यक्ष पदी नियुक्ती करून, पक्षप्रमुखांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला. नवनियुक्त शहाराध्यक्ष संजय घुगे यांनी सोमवारी सकाळी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली असून राज ठाकरे यांनी यावेळी घुगे याना शहाराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र दिले. महापालिका, लोकसभा व विधानसभा सार्वजनिक निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार असल्याची प्रतिक्रिया नवनिर्वाचित शहराध्यक्ष संजय घुगे यांनी दिले. तसेच जुने व नवीन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेईन पक्षाची ताकद वाढविणार असल्याचे घुगे म्हणाले. यापूर्वी शहराध्यक्ष पदी असतांना चमकदार कामगिरी घुगे यांनी केली होती.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे