शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी, फेब्रुवारीचे मानधन एप्रिल उजाडला तरी मिळेना! ट्रॅफिक वॉर्डन तीन महिने मानधनापासून वंचित

By प्रशांत माने | Updated: April 11, 2023 19:02 IST

महिना पाच हजार इतक्या तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र काम करणा-या या ट्रॅफिक वॉर्डनला वेळेवर मानधन मिळत नाही.

कल्याण:  एकिकडे स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत कल्याण डोंबिवलीत रस्ते  विकासाची कामे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना  मदत म्हणून केडीएमसीकडून ७५ वाहतूक स्वयंसेवक (ट्रॅफिक वॉर्डन) ची नियुक्ती करण्यात आली आहे. महिना पाच हजार इतक्या तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र काम करणा-या या ट्रॅफिक वॉर्डनला वेळेवर मानधन मिळत नाही.

गेले तीन महिन्यांपासून ते मानधनापासून वंचित आहेत. मार्चचे मानधन मिळणे अपेक्षित असताना जानेवारी, फेब्रुवारीचे मानधन एप्रिल महिना उजाडला तरी मिळालेले नाही. सध्याच्या काळ हा सणासुदीचा आहे. आधीच तुटपुंजे मानधन,  ते ही वेळेवर मिळत नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा तरी कसा? असा सवाल संबंधितांकडून केला जात आहे.

अरूंद रस्ते आणि दिवसागणिक वाढती वाहने यात वाहतूक कोंडीचे चित्र शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये वेळोवेळी दिसून येते. वाहतूकीचे नियमन वाहतूक पोलिसांकडून होते परंतू त्यांची संख्या अपुरी असल्याने उदभवणारी वाहतूककोंडी सोडविताना त्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येतात. दरम्यान शहरात सुरू असलेली रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे आणि त्यामुळे होत असलेला वाहतूकीचा खोळंबा पाहता २०१० ला वाहतूक पोलिसांच्या मदतीला केडीएमसीकडून ट्रॅफिक वॉर्डन देण्यात आले. हे वॉर्डन वाहतूक विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेतरी त्यांना मानधन हे मनपाकडून दिले जाते.

सुरूवातील वॉर्डनची संख्या ही आठ ते दहा होती. पुढे ही संख्या गरजेनुसार वाढत गेली. सद्यस्थितीला ही संख्या ७५ आहे. तब्बल १२ तास डयुटी करणा-या या ट्रॅफिक वॉर्डनला सुरूवातीच्या काळात २ हजार रूपये इतके तुटपुंजे मानधन दिले जात होते. २०१६ मध्ये मानधन वाढवून ते ५ हजार रूपये इतके करण्यात आले.  दरम्यान तुटपुंजे ५ हजार रुपयांचे मानधन ही वेळेवर मिळत नसल्याचे वास्तव पहायला मिळत आहे. 

मानधनात १ हजार रुपयांची वाढ५  हजार रूपये मानधनात वाढ होऊन ते ८ हजार रूपये मिळावे असा प्रस्ताव पोलीस उपायुक्त वाहतूक ठाणे शहर विभागाकडून जानेवारी २०२२ आणि नंतर सप्टेंबर २०२२ मध्ये मनपाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान आधीच्या मानधनात १ हजार रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती मनपा च्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्या वतीने देण्यात आली. मानधनाला विलंब झाल्याबाबत माहिती नाही चौकशी करावी लागेल असे त्यांच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :kalyanकल्याणtraffic policeवाहतूक पोलीस