शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिंदे गटात जाण्याच्या अफवा, ओमी कलानी तुतारी चिन्हावर रिंगणात राहणार!

By सदानंद नाईक | Updated: October 2, 2024 19:15 IST

उल्हासनगरातील राजकारणात व सोशल मीडियावर ओमी कलानी हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील किंवा भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

उल्हासनगर : भाजप व शिंदेंसेनेत जाण्याच्या अफवेला पूर्णविराम देत ओमी कलानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत घेऊन कमलेश निकम व मनोज लासी यांनी दिली. उमेदवारीबाबत वरिष्ठांची चर्चा झाल्याचे निकम म्हणाले.

उल्हासनगरातील राजकारणात व सोशल मीडियावर ओमी कलानी हे शिंदेंच्या शिवसेनेत जातील किंवा भाजपात प्रवेश घेणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, या सर्व चर्चा अफवा असल्याचे सांगत कलानी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याचे म्हटले आहे. कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक कमलेश निकम, मनोज लासी, अजित माखिजानी, आनंद शिंदे व पंकज त्रिलोकांनी यांनी बुधवारी दुपारी कलानी महल येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कलानी कुटुंब हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक असून गेल्या विधानसभेला भारत गंगोत्री यांना पक्षाने तिकीट देऊनही वेळेवर ज्योती कलानी यांना उमेदवारी दिल्याचा इतिहास आहे, असे निकम म्हणाले.

शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व पप्पू कलानी यांच्यात तिकीट वाटपाबाबत चर्चा झाली. त्यामुळे तुतारी निशाणी ओमी कलानी यांना मिळणार आहे. महाआघाडीकडून जेव्हा उमेदवारांची यादी  जाहीर होईल, तेव्हा त्यामध्ये ओमी कलानी यांचे नाव असेल, असे संकेत निकम यांनी दिले असून कलानी कुटुंबाने निवडणूक प्रचार सुरू केल्याचेही निकम म्हणाले. महाआघाडीचे मित्र पक्ष असलेल्या स्थानिक ठाकरे गट व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच कलानी यांना पाठिंबा घोषित केला आहे. ओमी कलानी तुतारी चिन्हावर निवडणुक रिंगणात उतरणार असल्याचेही निकम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कलानीवर ३ विधानसभेची जबाबदारीमाजी आमदार पप्पू कलानी यांच्यावर महाविकास आघाडीकडून उल्हासनगरसह अंबरनाथ, कल्याण पूर्वेची जबाबदारी मिळणार असल्याची माहिती कमलेश निकम व मनोज लासी यांनी दिली. त्या दृष्टिकोनातून कलानी यांनी तिन्ही विधानसभेचा प्रचार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला कलानी कुटुंब गैरहजरकलानी महल येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद कलानी समर्थक घेत होते. मात्र पत्रकार परिषदेला माजी आमदार पप्पू कलानी, शहरजिल्हाध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी यांची गैरहजेरी खटकत होती.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरNCPराष्ट्रवादी काँग्रेस