शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस हवालदारांचे निलंबन मागे घ्यावे; मनसेचे पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

By प्रशांत माने | Updated: January 25, 2024 20:02 IST

कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

कल्याण: कल्याणमध्ये दोन गटात राडा प्रकरणात अनिल जातक आणि महादेव चेपटे अशा दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोपवलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. दरम्यान मनसेने पोलिस कर्मचा-यांचे निलंबन त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कडलग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कल्याण पश्चिमेकडील चिराग हॉटेल परिसरात सोमवारी दोन गटांत वाद झाला होता. एका गटातील काही तरूण आपली चारचाकी वाहने घेऊन त्या ठिकाणाहुन जात होते. घोषणाबाजी ऐकताच दुसरा गट आला. त्याठिकाणी वाद झाला आणि त्याठिकाणी गाडयांवर लाथा मारण्याचे आणि काचा फोडण्याचे प्रकार घडले. दरम्यान याबाबत सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस हवालदार त्या गोंधळ आणि वाद करणाऱ्या युवकांना थांबवून त्या गाडया बाहेर काढताना दिसत आहेत. या हवालदारांनी मोठा राडा होण्यापासून थांबवले आहे. 

अशा परिस्थितीत त्यांचे कौतुक करायचे सोडून पोलिस विभागाकडून त्यांचे निलंबन केले गेले ही बाब लांच्छनास्पद आहे याकडे मनसेने निवेदनाव्दारे लक्ष वेधले आहे. ज्यांनी गोंधळ आणि वाद घातला अशांवर त्वरीत कारवाई व्हावी आणि पोलिस हवालदार यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस, कल्याण शहर अध्यक्ष तथा माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांकडून पोलिस अधिकारी कडलग यांना निवेदन देण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याणPoliceपोलिस