डोंबिवली : येथील कचोरे खाडीतील पाण्याच्या मधोमध टापूवर अडकून पडलेल्या दोन लहान मुलांना गावातील दोन तरुण गणेश मुकादम आणि शंकर मुकादम यांनी वाचवले. त्या दोन मुलांना त्यांनी पाण्यातून बाहेर काढले. एक मुलगा दोन वर्षांचा तर दुसरा सहा महिन्यांचा आहे. या दोन्ही मुलांना विष्णूनगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. विष्णूनगरचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय साबळे यांनी सांगितले की, या मुलांना घेऊन आई खाडीजवळ आली होती का, याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली. मात्र तिला कोणी पाहीलेले नाही, असेही साबळे म्हणाले. दोन्ही मुलांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
खाडीत अडकलेल्या दोन मुलांना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:15 IST