शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोड प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करा, माजी आमदारांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 00:30 IST

Kalyan News : रिंग रोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्याच्या कामासाठी मनपाने ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या टप्प्यात ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. बाधितांना मनपाकडून वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत.

कल्याण  : केडीएमसीच्या रिंग रोड प्रकल्पातील दुर्गाडी ते टिटवाळादरम्यानच्या टप्प्यात ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. या बाधितांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सोमवारी मनपा आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी बाधितांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन आयुक्तांनी पवार यांना दिले.पवार यांच्या समवेत भाजपचे पदाधिकारी शक्तिवान भोईर, अनंता पाटील, संदीप पाटील, शशिकांत पाटील, भरत कडाळी, प्रकल्पबाधित जालिंदर बव्रे, सुवर्णा पाटील, निर्मला गायकवाड व ॲड.संजय शंभरकर आदी उपस्थित होते.रिंग रोड प्रकल्पाच्या दुर्गाडी ते टिटवाळा या टप्प्याच्या कामासाठी मनपाने ७० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या टप्प्यात ८५० पेक्षा जास्त घरे बाधित होत आहेत. बाधितांना मनपाकडून वारंवार नोटिसा पाठविल्या जात आहेत. बाधितांनी न्यायालयात याचिका दाखल करून मनपाच्या विरोधात जाऊ नये, यासाठी मनपाच्या विधि विभागाने आधीच कॅव्हेट दाखल केले आहे.बाधितांपैकी प्रदीप सुपे यांनी मनपा आयुक्तांकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने सुपे यांनी मनपा मुख्यालयात आत्मदहनाचा इशारा आयुक्तांना दिला होता. मात्र, पवार यांनी आयुक्तांची भेट घेतली, त्यावेळी सुपे हेही उपस्थित होते. सुपे म्हणाले की, ‘बाधितांवर अन्याय केला जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. चर्चेवेळी आयुक्तांनी स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाचे आदेश आहेत की, २२ डिसेंबरपर्यंत वैध व अवैध अशा कोणत्याही बांधकामाच्या विरोधात कारवाई करू नये. त्यामुळे २२ डिसेंबरपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही.’ 

सुनावणीच्या अहवालाचे काय झाले?प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासंदर्भात केंद्रीय समाज कल्याणमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत एमएमआरडीए अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर, बाधितांनी मनसेचे आ. राजू पाटील यांच्याकडे दाद मागितली होती. पाटील यांनी बाधितांचे पुनर्वसन केल्याशिवाय त्यांच्या घराला हात लावू देणार नाही, असा इशारा मनपास दिला होता. दरम्यान, प्रकल्पबाधितांची सुनावणी घेऊन त्याचा अहवाल प्रशासनास सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले, हे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका