शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहूल गांधींनी एक दिवस घाणा चालवून दाखवावा, मी शिवसेना साेडून देईन; आ. विश्वनाथ भाेईर यांचे काॅंग्रेसला आव्हान

By मुरलीधर भवार | Updated: April 3, 2023 20:35 IST

'राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले.'

कल्याणस्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भाेगली. त्यांनी त्याठिकाणी घाणा चालविला. राहूल गांधीनी एक दिवस ताेच घाणा चालवून दाखविल्यास शिवसेना पक्ष साेडून देईन असे आव्हान शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भाेईर यांनी काॅंग्रेस पक्षाला दिले आहे.स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर गाैरव यात्रा ६ एप्रिल राेजी कल्याणमध्ये काढण्यात येणार आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी हाेण्याची शक्यता आहे.

ही यात्रा खडकपाडा येतून सांयकाळी पाच वाजता काढण्यात येणार आहे. यात्रेचा समाराेप गाैरीपाडा येथे हाेणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आयाेजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार भाेईर यांनी राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला. याप्रसंगी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, पदाधिकारी प्रेमनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक अर्जून भाेईर, माजी नगरसेविका वैशाली पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक माेहन उगले आदी मान्यवर उपस्थित हाेते.

यावेळी आमदार भाेईर यांनी राहूल गांधी यांच्या पूर्वजांचे आडनाव खान हाेते. खान हे नाव शाेभणार नाही. त्यामुळे त्यांनी गांधी हे नाव लावले. राहूल गांधीने सावरकरांचा वारंवार जाे अपमान केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र आत्ता पेटून उठला आहे. सावरकरांचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही सारे सावरकर हे दाखविण्यासाठी ही गाैरव यात्रा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

प्रखर देशभक्त सावरकर यांच्या विराेधात बाेलण्याचा अधिकार राहूल गांधीला काेणी दिला असा सवाल भाेईर  यांनी उपस्थित केला आहे. काॅंग्रेसवालेही त्याला कंटाळले आहेत. राहूल गांधी काॅंग्रेससह त्यांच्या मिक्ष पक्षांकरीता  अवघड जागेचे दुखणे हाेऊन बसले आहेत. युवराज असेल तर ताे त्याच्या घरी अशा शब्दात भाेईर यांनी टिका केली.

टॅग्स :kalyanकल्याणRahul Gandhiराहुल गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर