शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ती जरी हरली तरी ती लढली याचा अभिमान, वैष्णवी पाटीलच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:57 IST

पुरुष पैलवानाच्या बरोबरीनेच महिलासाठी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत मराठी मातीतल्या कुस्ती या खेळात मुलींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रथमच होतोय .

कल्याण-

पुरुष पैलवानाच्या बरोबरीनेच महिलासाठी देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत मराठी मातीतल्या कुस्ती या खेळात मुलींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न प्रथमच होतोय . महिला कुस्तीगीरासाठी सांगली येथे आयोजित पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कल्याणच्या मातीतील वैष्णवी पाटील हीने सांगलीतील प्रतीक्षा बागडी यांच्यात अंतिम सामना रंगला होता. आपल्या तालुक्यातील पैलवान केसरीच्या फायनल मध्ये गेल्याचे समजताच कल्याण नंदिवली जय बजरंग तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सर्वजण सकाळपासून डोळे लावून बसले होते.सामना सुरू झाला. दोघींना चार चार पॉइंट मिळाले होते मात्र प्रतीक्षाने डाव खेळला आणि वैष्णवीचा पराभव झाला. या सामन्यात वैष्णवी पराभूत झाली असली तरी पूर्ण क्षमतेने खेळली. पहिल्याच केसरी स्पर्धेत अंतिम सामन्या पर्यंत धडक दिली त्यामुळे आम्हाला तिचा अभिमान आहे वैष्णवी  हरली असली तरी तिने चांगली लढत दिली. याआधी देखील तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या पुढे ती पुन्हा जिंकेल असा वैष्णवीचे प्रशिक्षक सुभाष ढोणे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी वैष्णवीच्या प्रशिक्षकांनी तिच्या सहकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला

वैष्णवी अंबरनाथ तालुक्यातील मंगरूळ या गावची.. लहानपणापासूनच तिलाच नव्हे तर आई वडिलांना देखील  कुस्तीची विशेष आवड होती. वैष्णवीचया कुटुंबीयांनी तिला कुस्तीसाठी प्रोत्साहन दिले.  वैष्णवी पाटील हिने कल्याण मधील नांदीवली गावातील जय बजरंग तालमीत  पंढरीनाथ ढोणे, वसंत साळुंखे ,सुभाष ढोणे, प्रज्वलदीप ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीच धडे गिरवले. आतापर्यंत तिने सहा ते सात राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. आपल्या तालुक्यातील पैलवान केसरीच्या अंतिम सामन्यात गेल्याचे समजताच तालमीतील तिचे सहकारी तिच्या प्रशिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते. तिच्या लढतीकडे सर्वजण सकाळपासून डोळे लावून बसले होते. मात्र ती उपविजेती ठरली आहे. उपविजेती ठरली असली तिने हिंमत हारलेली नाही.