शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली, कल्याण पूर्व व उल्हासनगरच्या काही भागात शुक्रवारी वीज बंद; महापारेषणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 19:13 IST

डोंबिवली, उल्हासनगर दोन आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांची वीज काही काळ बंद राहणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

कल्याण:  महापारेषणकडून शुक्रवारी (११ फेब्रुवारी) सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान २२० केव्ही पडघा ते पाल आणि २२० केव्ही पडघा ते जांभूळ या अतिउच्चदाब वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे डोंबिवली, उल्हासनगर दोन आणि कल्याण पूर्व विभागातील महावितरणच्या काही ग्राहकांची वीज काही काळ बंद राहणार आहे. यासंदर्भात वीज ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश पाठवून पूर्वकल्पना देण्यात येणार असून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

डोंबिवली पश्चिमेतील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान बंद राहणार आहे. गरिबाचा पाडा व नवापाडा फिडर, तुकारामनगर फिडरवरील नव चेतन, सुदंरा कॉम्प्लेक्स, लक्ष्मण रेषा, मल्हार बंगलो, गावदेवी मंदिर, अंबरयोग, अयरेगावचा, सावरकर रोड, गोपाल नगर, गल्ली नंबर १ आणि २, पेंडसेनगर, टिळकनगर, पोस्ट ऑफिस चौक, आरपी रोड, संत नामदेव पथ, वसंतवाडी, चार रस्ता, गोपालनगर २, ३ व ४, जिजाई नगर, अंबिका नगर, गोग्रासवाडी, पाथर्ली रोड, शिखंडेवाडी, स्टार कॉलनी, मानपाडा रोड, आर अँड टी कॉलनी, संत समर्थ मठ, हनुमान मंदिर रोड, गांधीनगर, जुनी डोंबिवली, कोपर रोड.

कल्याण पूर्व विभागातील पुढील भागांचा वीजपुरवठा सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत बंद राहील – नांदिवली, सांदप, भोपर, उसरघर, देसलेपाडा, सोनारपाडा, मानपाडा, ललीतकाटा, लोढा हेवन, कटाई, निळजे परिसर, हेदुटणे, घेसर, उंभर्ली, कोळे, घारीवली, भंडारी पाडा, वैभव नगरी, मिलापनगर, सुदर्शन नगर, एमआयडीसी रहिवासी परिसर, सागाव खालचा पाडा व वरचा पाडा, चेरा नगर, शंखेश्वर नगर, भगवान पाटील व सुरेश पाटील कंपाऊंड, म्हात्रे नगर, तुकाराम वाडी, पाटील महाविद्यालय परिसर, रिजंन्सी, दावडी गाव, शंकरनगर, हॉरिझॉन मायसिटी व कासारिओ तसेच कासाबेला बिल्डिंग परिसर, मंगरुळ, उसटणे, उसटणे इंडस्ट्रिज पार्क, नऱ्हेन, पाली, चिरड, वाडी, करवले, पालेगाव, चिंचवणी, खोणी, काकडवाल, नेवाळी, नेवाडी पाडा, खरड, कुंभार्ली, पोसरी, शेलारपाडा, ढोका, कोळसेवाडी, म्हसोबा चौक, सिद्धार्थ नगर, मच्छी मार्केट, प्रभू राम नगर, जिम्मी बाग, शाहू गार्डन, लोकग्राम, लोकवाटिका, लोकधारा, नेतीवली नाका, मराठी शाळा, पुणे लिंक रोड, चिकनी पाडा, तिसगाव, शिवाजी कॉलनी, विजयनगर, विशालनगरी, घारडा केमिकल कंपनी, बीएआरसी, पलावा.   

उल्हासनगर दोन विभागात पुढील भागात सकाळी ८ ते दुपारी १ दरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे - प्रेमनगर, हिरापुरी, शहा मार्केट, दशहरा मैदान, ओंकारानंद आश्रम, निजधाम, तहसिलदार दुधनाका, कैलास कॉलनी, वंसतबहार, समतानगर, गायकवाड पाडा एक व दोन, आकाश कॉलनी एक, कोळेकर पाडा, दूर्गा पाडा, आकाश किराणा, जेमनानी कंपाऊंड, शांतीप्रकाश आश्रम, साई आर्केड, ओटी सेक्शन, कुर्ला कँप रोड, श्रीराम नगर, एकता नगर, आकाश कॉलनी, बारा नंगर बस स्टॉप, मानेरा, व्हिनस, संभाजी नगर, लालचक्की, गजानन नगर, कुर्ला कँप, आशेळे पाडा, आशेळे गाव, गणपत नगर, नेताजी पाणीपुरवठा, उल्हासनगर चार व पाच विभाग, बारकू पाडा, रिलायन्स, पालेगाव, अंबरनाथ एफ टाईप एमआयडीसी विभाग, इंडस्ट्रियल भाग, अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्र, आनंदनगर एमआयडीसी.

टॅग्स :electricityवीज