शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीच्या काही भागात आजपासून दोन दिवस वीज बंद; सहकार्य करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 12:38 IST

डोंबिवली : वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड, आदी ठिकाणच्या काही भागांचा वीजपुरवठा काही तासांसाठी ...

डोंबिवली : वीज वितरण यंत्रणेच्या पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवलीतील रामनगर, टिळकनगर, केळकर रोड, आदी ठिकाणच्या काही भागांचा वीजपुरवठा काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

डोंबिवलीच्या इनकमर एक फिडरवरील टिळकनगर, रामनगर, गणेश मंदिर, केळकर रोड, टिळकनगर फिडरवरील बालभवन, चिपळूणकर रोड, मानपाडा रोड, चित्तरंजन दास रोड, आरपी रोड, टाटा लाईन या भागात सोमवारी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत, तर केळकर रोड फिडरवरील केळकर रोड, उसेरकरवाडी, पूजा मधुबन, मानपाडा रोड टॉकीज, शिवसेना शाखा, केडीएमसी, आदी भागाचा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

रामनगर फिडरवरील रामनगर पोलीस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात मंगळवारी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल. देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वयंचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना दिल्याचा दावा महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला.

टॅग्स :electricityवीजkalyanकल्याणdombivaliडोंबिवली