शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये होऊ द्या चर्चा कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली

By मुरलीधर भवार | Updated: October 7, 2023 20:14 IST

​​​​​​​कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कल्याण-कल्याण विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हाेऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र उल्हासनगरातील होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका व्यकितने पंतप्रधानांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने कल्याणमधील कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्या ८ ते १५ आ’क्टोबर दरम्यान विविध ठिकाणी हाेऊ द्या चर्चा हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाची रितसर परवानगी शहर प्रमुख सचिन बासरे यांच्याकडून पोलिसांकडे मागण्यात आली होती. काही अटी शर्ती घालून पोलिसांनी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमास परवानगी दिली होती. दरम्यान ५ आ’क्टोबर रोजी उल्हासनगरात हाच कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानाच्या विरोधात एका तरुणाने अपशब्दाचा वापर केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला. त्याची पुनर्रावृत्ती अन्य ठिकाणच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात होऊ शकते. त्यातून वादंग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. पोलिसांनी कल्याणमधील कार्यक्रमास दिलेली परवानगी नाकारली आहे.पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शहर प्रमुख बासरे यांनी पोलिसांनी नाकारलेली परवानगी योग्य नाही. मात्र या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार आहे. कल्याण छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दहिहंडी साजरी करण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी ठाकरे गटाला परवानगी नाकारल्यानंतर शहर प्रमुख बासरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने छत्रपती शिवाजी चौकातपासून हाकेच्या अंतरावर दहिहंडी साजरी करण्याचे आदेश दिले होते. दहिहंडी पाठोपाठ किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दोन्ही गटाकडून मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळणे बाकी आहे. त्या पाठोपाठ आता होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारल्यावर ठाकरे गटाकडून पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले जाणार आहे. 

टॅग्स :Policeपोलिस