शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

'वामनदादा हा आभाळा ऐवढा माणूस'; कवी किरण येले यांचे उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 15:22 IST

Waman Kardak : कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्टय़ाच्या वतीने लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्य़ास आजपासून सुरुवात झाली.

कल्याण - लोककवी वामनदादा कर्डक हा जनसामान्यांचा आवाज होता. ते रस्त्यावरील कवी होते. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची छत्रछाया लाभली होती. त्यामुळे हा माणूस आभाळा ऐवढा मोठा होता असे उद्गार लोककवी वामन कर्डक जन्मशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष कवी किरण येले यांनी येथे काढले. 

कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात पु. ल. कट्टय़ाच्या वतीने लोककवी वामन कर्डक यांच्या जन्मशताब्दी सोहळ्य़ास आजपासून सुरुवात झाली. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते या सोहळ्य़ाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, कवी प्रशांत मोरे, कायद्याने वागा चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवियत्री वृषाली विनायक यांनी केले.  

महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कवी येले यांनी सांगितेल की, मी देखील रस्त्यावरचा कवी आहे. वामनदादा हे देखील रस्त्यावरचे कवी होते. ते ख:या अर्थाने लोक कवी असल्याने त्यांची जन्मशताब्दी रस्त्यावर भरगच्च कार्यक्रम घेऊन साजरी करण्याचे नियोजन होते. त्याठिकाणी नंदीबैलवाले, वैदू, पोतराज, गोंधळी आदींना घेऊन शुभारंभ करायचा होता. कोरोना नियमावली आणि पावसामुळे ते शक्य नाही. मात्र ही जन्मशताब्दी देशभर पोहचवायची आहे. वर्षबर वामनदादांच्या साहित्याचा जागर चालवायचा आाहे. ऑफलाईन पद्धतीने जमले नाही तर ऑनलाईन पद्धतीने विविध स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जाणार आहे. त्याला सगळयांचीच साथ हवी आहे असे आवाहन केले. 

कवी म्हात्रे यांनी साहित्यातही बुद्धी आणि श्रम अशी विभागणी आहे. त्यात श्रमाच्या साहित्याला फारसे महत्व दिले गेले नसले तरी वामनदादांचे साहित्य हे जनमानसात रुजलेले आहे. शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर लगेच कवी संमेलन घेण्यात आले. त्यात कवी संदेश ढगे यांनी बादशहा नावाची कविता वाचली. वामनदादांसारखे कविता करण्याचे धाडस करणो शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. घरातील विजेची बिल जरी जास्त आले तरी आपला आवाज निघत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कवी माधव डोळे यांनी सांगितले की, वामनदादा हे थेट बाण मारायचे. त्यांच्यासारखे बाण मारमारी गझल त्यांनी सादर केली. कवी आकाश यांनी प्रेमकविता सादर केली. कवी रमेश आव्हाढ यांनी स्वातंत्र्यावरची कविता सादर केली. तर कवी अरुण म्हात्रे यांनी रानाच्या झाडातून जाते माङया माहेराची वाट ही हळूवार भावना टिपणारी वामनदादांची कविता सादर करुन सगळ्य़ांची वाह वाह मिळविली. 

टॅग्स :kalyanकल्याण