शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

कल्याणातील आयसीए भवनसाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध

By मुरलीधर भवार | Published: April 13, 2024 2:37 PM

गेल्या १० वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे.

मुरलीधर भवार, कल्याण : गेल्या १० वर्षांचा विचार करता देशामध्ये कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. तसेच वन नेशन वन टॅक्स प्रणालीमुळे आज जीएसटीचे संकलन २ लाख कोटींपर्यंत पोहोचले असून देशाच्या विकासामध्ये चार्टर्ड अकाऊंटंटस्चे योगदानही महत्त्वाचे असल्याचे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स या संस्थेच्या कल्याण डोंबिवली शाखेला आयसीए भवन बांधण्यासाठी केडीएमसीकडून भुखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानिमित्त कल्याणात आयोजित सोहळ्याला मंत्रीचव्हाण आणि खासदार शिंदे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील असणारे सरकार हे विकासाच्या बाबतीत केवळ फास्ट नाही तर सुपरफास्ट आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात देशामध्ये आमूलाग्र बदल झाले असून देशाप्रमाणे सीएंचेही अच्छे दिन आल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

तर समाजाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ज्याप्रमाणे डॉक्टर आपली भूमिका बजावत असतात. अगदी त्याचपद्धतीने देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सीए वर्ग प्रयत्नशील असतात. देशाच्या आर्थिक विकासामध्ये आणि ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्यात सीएंचेही मोठे योगदान असेल अशी भावना यावेळी खासदार शिंदे यांनी व्यक्त केली.

कल्याणातील चिकणघर परिसरात उभे राहणार सुसज्ज आयसीए भवन...कल्याण डोंबिवली शाखेचे दिवा - भिवंडीसह थेट कर्जत - कसाऱ्या पर्यंतच्या भागातील तब्बल ५ हजारांहून अधिक चार्टर्ड अकाऊंटंट सदस्य आणि १५ हजारांहून अधिक विद्यार्थी सलग्न आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून कल्याण पश्चिमेतील चिकणघर परिसरात तब्बल १७ गुंठ्यांचा भुखंड चार्टर्ड अकाऊंटंटस् च्या कल्याण डोंबिवली शाखेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये सुसज्ज असे ऑडीटोरियम, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी, कॉम्प्युटर कक्षासह क्लासरूम ट्रेनिंग सेंटरचा समावेश असेल अशी माहिती समिती सदस्य सीए कौशिक गडा यांनी दिली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसीचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे, शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, सीए संघटनेच्या सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे, सीए प्रिती सावला, सीए राजकुमार अडुकिया, पियूष छाजेड यांच्यासह कल्याण डोंबिवली ब्रँचचे अध्यक्ष सीए मयूर जैन, उपाध्यक्ष राकेश अग्रवाल, सचिव अमित मोहरे, खजिनदार विकास कामरा, गिरीश तारवानी, पराग प्रभुदेसाई, सुहास आंबेकर, प्रदीप मेहता, कौशिक गडा आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाShrikant Shindeश्रीकांत शिंदे