शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडच्या टप्पा ३ चे काम लवकर हाती घेणार; पावसाळ्यापूर्व रस्ते विकासाची कामे मार्गी लावा

By मुरलीधर भवार | Updated: April 5, 2024 20:56 IST

केडीएमसी आयुक्तांचे आदेश, आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

कल्याण- विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३६० कोटी रुपयांची रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाची कामे प्रगती पथावर आहेत. यात एमएमआरडीएकडून २४ रस्त्यांची आणि महापालिकेकडून ७ रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. याच बरोबर रिंगरोडच्या टप्पा ३ चे काम हाती घेण्यात येत आहे या कामात भेडसावणा-या विविध अडचणीचा आढावा घेऊन पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी आज सर्व सबंधितांची आढावा बैठक घेतली.

बैठकीत या कामातील बाधित बांधकामांच्या निष्कासनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित उप आयुक्त आणि प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना तसेच भूसंपादन, जागेच्या अडचणीसंदर्भात नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दिशा सावंत यांना देण्यात आले. डोंबिवली येथे महानगर गॅस मार्फत करण्यात येणा-या खोदाईबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित सर्व कामे पुढील आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त जाखड़ यांनी महानगर गॅसच्या प्रतिनिधीना दिले. या कामात असलेले विद्युत टान्सफॉर्मर, जल आणि मलवाहिन्या यांच्या अडचणी संदर्भात एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढून काम कालबध्द पद्धतीने   करण्याच्या सूचना संबधित अभियंत्याना दिल्या आहेत. पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात कामे पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले.या बैठकीस शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता कोरगावकर, अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, कार्यकारी अभियंता देवरे, महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, परिमंडळ उप आयुक्त प्रसाद बोरकर, रमेश मिसाळ, संबधित प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी आदी अधिकारी उपस्थित होते.