शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पत्रीपूल जानेवारीत होणार खुला, खासदारांनी रात्र काढली जागून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 06:09 IST

मध्यरात्री घेतला मेगा ब्लॉक : खासदारांनी रात्र काढली जागून

कल्याण : कल्याण पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी रविवारी दुपारी वेळ अपुरी पडल्याने १० टक्के काम अपूर्ण होते. या कामाच्या पूर्ततेसाठी मध्यरात्री रेल्वेने विशेष मेगाब्लॉक घेऊन हे काम साेमवारी पहाटे ६ वाजता पूर्ण करण्यात आले आहे. ७०० टन वजनाच्या गर्डर लाँचिंगची मोहीम अखेर फत्ते झाली आहे. पत्रीपुलाची अन्य कामे डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

पत्रीपुलाच्या भल्या मोठ्या गर्डर लॉंंचिंगसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर या दोन दिवसांत प्रत्येकी चार तासांचा रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. पहिल्या दिवशी चार तासांत गर्डर ४० मीटर पुढे सरकवण्यात आला होता. उर्वरित गर्डर सरकवण्याचे काम रविवारी करण्यात आले. दादर येथे उद्यान एक्स्प्रेस बंद पडल्याने रेल्वे मेगाब्लॉकला विलंब झाला. त्यामुळे वेळ अपुरी पडून १८ मीटर गर्डर सरकवण्याचे काम शिल्लक होते. त्यामुळे रेल्वेने तातडीने ब्लॉक द्यावा, अशी मागणी खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे दुपारीच केली होती. रविवारी रात्री १.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हा विशेष ब्लॉक घेण्यात आला. विशेष ब्लॉक घेतल्यानंतरही काही तांत्रिक अडचणी येत होत्या. ब्लॉकची वेळ संपल्यानंतरही हे काम सावधानता व सुरक्षितता बाळगून सुरू होते. १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले काम पहाटे ६ वाजता पूर्ण झाले. 

शिवसैनिकांनी फाेडले फटाकेn खासदार शिंदे यांच्यासाेबत रात्रभर शिवसैनिक व पदाधिकारीही उपस्थित होते. काम पूर्ण होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून कामपूर्तीचा आनंद व्यक्त करून जल्लोष केला. खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवली