शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांतील प्रवासी घटले; बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या खचाखच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 23:38 IST

कोरोनाची धास्ती : बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या खचाखच

अनिकेत घमंडीडोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता उत्तरेसह दक्षिणेकडून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासीसंख्येत घट झाली आहे. मात्र, त्याचवेळी देशभरात अन्यत्र जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, दादर, ठाणे, कल्याण स्थानकांत इतर राज्यांत आपल्या गावी जााण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केलेली दिसत आहे. रेल्वेच्या आरक्षण तिकिटांच्या चार्टवरूनही ही बाब स्पष्ट होत आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. उत्तर आणि दक्षिणेकडून मुंबई परिसरात सध्या आपत्कालीन परिस्थितीत सुमारे ६० लांब पल्ल्यांच्या गाड्या येत आहेत. त्यातील मुंबई, कल्याण, ठाणे परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. उत्तर प्रदेश, दक्षिणेकडे जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे.  त्यामुळे तिकडे जाणाऱ्या गाड्या खचाखच भरून जात आहेत. साधारणपणे उन्हाळ्यात या गाड्यांना गर्दी असतेच, पण यंदा काेराेनाच्या धास्तीमुळे या गर्दीत आणखी भर पडली आहे. बहुतांश गाड्यांचे पुढील पंधरवड्यापर्यंत आरक्षण फुल्ल झाले आहे. त्याउलट स्थिती मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची आहे. त्या गाड्या सोलापूर, मनमाडनंतर रिकाम्या धावत आहेत.

मुंबई परिसरातील वाढता कोरोनाचा धोका, रद्द झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा यामुळे पालक कुटुंबीयांना गावी पाठवण्याच्या मानसिकतेत आहेत. साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुलांच्या परीक्षा संपतात.  त्यानंतर गाड्या फुल्ल होतात. यंदा त्याआधीच गाड्यांची आरक्षणे भरलेली आहेत. तसेच येण्याची घाई नसल्याने परतीचे फारसे  नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले  आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाlocalलोकल