शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:17 IST

हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्या! दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची बातमी पाहताच पांडे यांनी हेमंत यांना मेसेज केला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही

प्रशांत मानेडोंबिवली  - जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या मावसभावांचा दहशतवादी हल्ल्यात मंगळवारी मृत्यू झाला. घरातील तरुण कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मृत्यूच्या आघातामुळे आप्तस्वकीय, मित्र, तसेच त्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी तीव्र शोक व्यक्त केला. कुटुंबासमवेत गेलेल्या पर्यटकांनाच जर दहशतवादी गोळ्या घालत असतील, तर आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का? असा सवाल रहिवाशांनी केला.

शिपिंग कंपनीत असलेले ४३ वर्षीय हेमंत जोशी पत्नी मोनिका आणि मुलगा ध्रुवसह डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानासमोरील सावित्री को-ऑप. सोसायटीत चौथ्या मजल्यावर राहायचे. हेमंत परिवारासह रविवारी डोंबिवलीतून जम्मू-काश्मीरसाठी रवाना झाले. आम्ही सात दिवसांत येतो, असे त्यांनी सोसायटीचे चेअरमन जी. एन. पांडे यांना सांगितले होते. दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची बातमी पाहताच पांडे यांनी हेमंत यांना मेसेज केला; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पांडे यांनी  हेमंत यांच्या सासऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी हेमंत यांचा मुलगा ध्रुव याने सुखरूप आहोत, असा मेसेज पाठविल्याचे सांगितले. तथापि रात्री टीव्हीवर हेमंतच्या मृत्यूची बातमी आली, पण आमचा विश्वास बसेना. आम्ही  पुन्हा त्यांच्या सासऱ्यांशी संपर्क साधला असता हेमंत यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला, असे पांडे, तसेच हेमंत यांचे शेजारी प्रमोद गुप्ता यांनी सांगितले.

मुलाची परीक्षा होताच काश्मीर सहलीचा प्लॅनहेमंत जोशी यांचा मुलगा ध्रुव याने यंदा दहावीची परीक्षा दिली. तत्पूर्वीच जोशी कुटुंबाने नातेवाईक असलेल्या लेले आणि मोने कुटुंबासमवेत जम्मू-काश्मीरला जाण्याचा प्लॅन केला. रविवारी तिन्ही कुटुंबे डोंबिवलीहून रवाना झाली; परंतु हेमंत आणि त्यांच्या नातेवाइकांच्या मृत्यूने नातेवाइकांसह इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये शोककळा पसरली.

तू हो पुढे, मी येतोच आहेडोंबिवलीतील ४४ वर्षीय अतुल मोनेंचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. पत्नी अनुष्का, मुलगी ऋचा सुखरूप आहेत. पश्चिमेकडील सम्राट चौकात श्रीराम अचल सोसायटीत राहणारे अतुल मध्य रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता होते. इथले रहिवासी महेश सुरसे २२ मे रोजी काश्मीरला जाणार होते. अतुल यांनी रविवारी काश्मीरला जात असल्याचे महेश यांना सांगितले. त्यावर तू हो पुढे आणि मला तेथे काय काय पाहिले, कसे एन्जॉय केले, वातावरण कसे ते सांग, असे महेश अतुल यांना म्हणाले होते. त्यांच्या मृत्यूबद्दल खूपच वाईट वाटते. मी माझे २२ मे रोजीचे काश्मीरचे तिकीट रद्द केल्याचे महेश म्हणाले.

मंगळवारी रात्री टीव्हीवर बातमी बघितली होती. नाव आणि आडनाव साधर्म्य असलेला अन्य कोणीतरी संजय लेले असेल असे वाटले होते; परंतु बुधवारी संजयचा पेपरमध्ये फोटो पाहिला आणि एकच धक्का बसला. संजय अत्यंत जवळचा मित्र होता. त्याला क्रिकेट खेळायला खूप आवडायचे - प्रवीण राऊळ, संजय लेले यांचे बालपणीचे मित्र

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर