शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमीच्या अल्ट्रा दौडचे आयोजन

By मुरलीधर भवार | Updated: February 1, 2024 19:36 IST

डोंबिवली-गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमी च्या अल्ट्रा दौड चे आयोजन रनर्सक्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने करण्यात ...

डोंबिवली-गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली या ६५ किमी च्या अल्ट्रा दौड चे आयोजन रनर्सक्लॅन फाऊंडेशन, डोंबिवली यांच्या वतीने करण्यात आलेले आहेगेट वे ऑफ इंडिया ते डोंबिवली असे ६५ किमी.अल्ट्रा दौड आयोजित करून देशाच्या सीमेवर अहोरात्र तैनात असलेल्या आणि आम्हा देशवासीयांच्या सुरक्षेसाठी संरक्षण दलात सेवा बजावणार्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करुन त्यांना अनोखी मानवंदना देण्यासाठी एक दौड वीर जवानोंके लिए असे घाेषवाक्य आहे. या दौडचे हे चौथे वर्ष आहे.

ही दौड ३ फेब्रुवारीला रात्री १२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथून सुरु होईल . ४ फेब्रुवारीला सकाळी ८ ते ८:३० दरम्यान डोंबिवलीतील आप्पा दातार चौक गणपती मंदीर येथे पूर्ण केली जाईल. तिचा मार्गगेटवे ऑफ इंडिया ,मंत्रालय, एनसीपीए, हुतात्मा चौक, पी डिमेलो मार्ग, शिवडी, वडाळा,सायन सर्कल, चेंबूर, वाशी बस डेपो,कोपरखैरणे,महापे, शिळफाटा, विको नाका, कॅ.विनयकुमार सच्चान स्मारक, चार रस्ता मार्गे आप्पा दातार चौक असा आहे. डोंबिवली कल्याण किंवा जवळपासच्या गावातून भारतीय लष्कर, नौदल, वायुदल, निमलष्करी दल,पोलिस, इ. संरक्षण क्षेत्रात भरती होउ इच्छिणा-या होतकरू तरूणांसाठी / तरुणींसाठी भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी निधी जमा करणे. येत्या वर्षभरामध्ये असे भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि अद्ययावत ग्रंथालय उभे करण्याचे उद्दीष्ट् संस्थेने आखले आहे.

या दौडमध्ये जागतिक पातळीवरील मॅरेथॉन गाजविणारे काॅम्रेड्स धावपटू, आयर्नमॅन मानांकित अल्ट्रा धावपटू ,मॅरेथॉन रनर्स , उदयोन्मुख धावपटू, तसेच डोंबिवली,कल्याण, ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापुर, औरंगाबाद, मध्य प्रदेश, दिल्ली आदी ठिकाणाहून जवळजवळ ३०० धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच डॉक्टर,इंजिनिअर,उद्योजक, निवृत्त अधिकारी असे समाजातील विविध स्तरातील लोकांचा सहभाग आहे. धावपटुंचे स्वागत करण्यासाठी नागरीकांनी रविवारी सकाळी आप्पा दातार चौक यावे असे आवाहन रनर्स क्लॅन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.