शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गरबा उत्सवाचे आयोजन, डोंबिवलीत रस्ते वाहतुकीत बदल

By प्रशांत माने | Updated: October 12, 2023 18:10 IST

कोंडीची स्थिती उदभवू नये याकरिता या भागातील वाहतूकीत बदल केले गेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: नवरात्रौत्सवात पुर्वेकडील नांदिवली रोडवरील डिएनसी ग्राऊंडवर शिवसेनेतर्फे गरबा उत्सव आयोजित केला जातो. त्याठिकाणी होणारी गर्दी पाहता वाहतुककोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कोंडीची स्थिती उदभवू नये याकरिता या भागातील वाहतूकीत बदल केले गेले आहेत. यानिमित्ताने डोंबिवली शहर वाहतुक उपविभागाच्या वतीने अधिसूचना काढण्यात आली आहे.

नांदीवली रोडवरून एकतानगर, छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून दत्तनगर चौकाकडे येणारी वाहतुक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. रविवार १४ ऑक्टोबर ते मंगळवार २४ ऑक्टोबर या कालावधीत संध्याकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत नांदीवली रोडवरून दत्तनगर चौकाकडे येणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक/ एकता नगर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक/एकतानगर चौक येथून उजवे वळण घेवून संगीतावाडी अथवा पांडुरंगवाडी मार्गे इच्छीत स्थळी जातील अशी माहीती डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलिस निरिक्षक उमेश गित्ते यांनी दिली. हे वाहतुकीतील बदल पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही असेही गित्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Navratriनवरात्रीdombivaliडोंबिवली