शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

पलावा काटई पुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार!

By अनिकेत घमंडी | Updated: August 17, 2023 19:49 IST

खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली एमएसआरडीसी अधिकाऱ्यांची बैठक

पलावा जंक्शनच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची होणार मुक्तता

अनिकेत घमंडी, डोंबिवली: कल्याण शीळ महामार्गावरील पलावा ते काटई उड्डाणपुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू केली जाणार असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत त्यांनी या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला. या उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. कल्याण शीळ महामार्ग हा कल्याण, डोंबिवली आणि त्यापुढील शहरांना ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडत असल्याने अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या मार्गावर २४ तास वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र पलावा जंक्शनवरील वाहतूक कोंडीमुळे या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने देसाई खाडी ते काटई असा उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी भूसंपादनात अडथळे आल्याने हे काम अडकून पडले होते. या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेत या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा घेतला सद्यस्थितीत या पुलाचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून रेल्वेने सुद्धा पुलाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. उड्डाणपुलाचे स्टील स्ट्रक्चर तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून गर्डर लाँचिंग केल्यानंतर इतर कामांना वेग येऊ शकणार आहे. बीपीसीएलमुळे पुलाच्या कामात आलेले अडथळे दूर करण्यासाठी बैठक घेतली जाणार आहे. या पुलाची एक मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत सुरू करणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये दुसरी मार्गिका सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न असणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.        मुंबईच्या एमएसआरडीसी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासह एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता एस. के. सुरवसे उपस्थित होते

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे