शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनानिमित्त केडीएमसी प्रशासनासह, पोलिस यंत्रणा सज्ज

By प्रशांत माने | Updated: September 27, 2023 18:53 IST

वाहतूकीबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन वाहनचालकांसह गणेशभक्तांनी करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

कल्याण: अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्या गुरूवारी कल्याण-डोंबिवली शहरातील १७३ सार्वजनिक मंडळांचे आणि १३ हजार ६५ घरगुती अशा १३ हजार २३८ गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गणेश विसर्जन प्रक्रिया सुलभ व्हावी, विसर्जन मिरवणूकीदरम्यान वाहतूककोंडी होऊ नये या दृष्टीकोनातून केडीएमसी, वाहतूक आणि शहर पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील गणेशघाट विसर्जनासाठी सुसज्ज ठेवले असताना कृत्रिम तलाव आणि विसर्जन आपल्या दारी आदी उपक्रमही केडीएमसीकडून राबविले जाणार आहेत.

कल्याण डोंबिवलीतील विसर्जनस्थळांच्या ठिकाणी एकुण २ हजार ६७० हॅलोजन बसविण्यात आले आहेत. त्यासाठी एकुण ७२ जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. ९४ ठिकाणी टॉवर लायटिंग व्यवस्था करण्याबरोबरच ३४ ठिकाणी एकुण १७२ सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. निर्माल्य संकलन करण्यासाठी कल्याणमध्ये दोन डंपर आणि डोंबिवलीमध्ये दोन डंपर्सचे (निर्माल्य रथ) नियोजन करण्यात आले आहे.

ड्रोनद्वारे गर्दीवर नजरगर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून वाहतूक आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. ११३ पोलिस अधिकारी, ५४७ पोलिस कर्मचारी, १६८ महिला पोलिस कर्मचारी , १०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकडया विसर्जन कालावधी दरम्यान दोन्ही शहरात तैनात राहणार आहेत. वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्याबरोबरच कल्याण शहरातील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग एकदिशा करण्यात आले आहेत. वाहतूकीबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन वाहनचालकांसह गणेशभक्तांनी करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवkalyanकल्याण