शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर शेतकऱ्यांचे आंदोलन; जन आंदोलनासाठी सामाजिक संघटनांना हाक

By मुरलीधर भवार | Updated: October 29, 2022 18:35 IST

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या ५० व्या दिवशी मोठे जन आंदोलन उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. 

कल्याण :  भिवंडी- कल्याण-शिळफाटा, राज्य महामार्ग क्रमांक ४० या मार्गावरील रस्ते बाधित शेतकऱ्यांना तसेच भूमिपुत्र जमीन मालकांना मोबदला मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षिय युवा मोर्चा व कल्याण-शिळफाटा रस्ता बाधित शेतकऱ्यांचे आयोजित बेमुदत धरणे आंदोलन अद्याप सुरू आहे. या आंदोलनाचा आज आज ४० वा दिवस आहे. या ४० दिवसात राज्य शासनाने जिल्हाधिकारी ठाणे यांचे अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीच्या अहवालाबाबत केवळ बैठका झाल्या. हा अहवाल पूर्ण न झाल्यामुळे राज्य शासनाला मोबदल्याबाबत भूमिका जाहीर करता आली नाही.

मागील चार वर्षांपासून भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्यातील भूसंपादन व मोबदल्याबाबत गठीत समितीच्या अहवालास लागलेला विलंब व मागील ४० दिवसांच्या शेतकरी आंदोलनाची राज्य शासनाने दखल न घेतल्यामुळे येथील प्रकल्प बाधित शेतकरी भूमिपूत्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या अनुषंगाने आज  आंदोलन ठिकाणी बैठक संपन्न झाली. राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाच्या ५० व्या दिवशी संविधानिक मार्गाने खूप मोठे जन आंदोलन करण्याची मागणी रस्ता बाधितांकडून आज करण्यात आली.

आंदोलनाच्या ४० व्या दिवशी सुद्धा कल्याण-शिळफाटा रस्त्यातील बाधित जमिनीच्या मोबदल्याबाबत राज्य शासनाने निर्णायक भूमिका न घेतल्यामुळे रस्ता बाधितांनी ५० व्या दिवशी खूप मोठे जन आंदोलन उभे करण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी आंदोलनाच्या ४५ व्या दिवशी गुरूवार ता.०३ ऑक्टोबर या आंदोलनासाठी जाहिर पाठींबा दिलेल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या नेते पुढारींना निमंत्रीत करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील जन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यामध्ये दि. बा. पाटील सर्व पक्षिय नामकरण समिती, आगरी सेना यासह इतर वेगवेगळ्या ३० ते ४० स्थानिक सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे.असे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितले.

  

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरीFarmers Protestशेतकरी आंदोलन