शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

By सदानंद नाईक | Updated: June 11, 2025 21:05 IST

उल्हासनगर महापालिका सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, कलानी, रिपाई गट यांच्यात चढाओढ लागली आहे. भाजपाला महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कलानी व शिंदे गटाने एकमेकाकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानी यांनी समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने, राजकीय गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच भाजप प्रवेशाला पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात असून महापौर पदासाठी पंचम कलानी प्रमुख दावेदार आहेत.

उल्हासनगर महापालिका सत्तेसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, काँग्रेस, कलानी, रिपाई गट यांच्यात चढाओढ लागली आहे. भाजपाला महापालिका सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कलानी व शिंदे गटाने एकमेकाकडे दोस्तीचा हात दिल्याची चर्चा आहे. ओमी कलानी यांनी निवडक समर्थकासह शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुभेच्छा भेट घेतली. तसेच कलानी शिवाय कोणताच पक्ष महापालिका सत्तेत बसण्याची शक्यता नसल्याने, सर्वच पक्षाला कलानी हवेहवेसे आहेत. मात्र वारंवार पक्ष बदलीचा फटका कलानी यांना बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व नियम धाब्यावर बसून कलानी कुटुंबानी दोस्तीचा हात नावाखाली श्रीकांत शिंदे यांच्यासाठी प्रचार केला होता. पंचम कलानी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष असून पप्पू कलानी यांचा ओढाही शरद पवार गटाकडे असल्याची कुजबुज सुरु आहे. दरम्यान ओमी कलानी यांनी निवडक समर्थकासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने, राजकीय समिकरण बदलण्याची शक्यता आहे. 

ओमी कलानी यांनी शिंदे गटा सोबत युती केल्यास शिवसेना शिंदे गट व कलानी यांचे पारडे जड होण्याची शक्यता आहे. मागील राजकीय इतिहास बघता दोन्ही पक्ष महापौर पद अडडीच अडडीच वर्ष वाटून घेणार असल्याचे बोलले जाते. भाजपाची ताकद मर्यादित असून गेल्या महापालिका निवडणुकीत कलानी यांच्यामुळे भाजपाचा महापौर निवडून आला होता. ठाकरे गटाकडे सामान्य शिवसैनिकांचा ओढा असल्याने, काँग्रेस व शरद पवार गटाच्या मदतीने नगरसेवक निवडून येणार असल्याचे चित्र दिसत आहे.

 पप्पू कलानीच्या भूमिकेकडे लक्ष माजी आमदार व शहराचे आकर्षण असलेले पप्पू कलानी हे महापालिका निवडणुकीत काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले. ओमी कलानी यांच्याकडे पप्पू कलानी यांचीच राजकीय ताकद आहेत. राजकीय पक्षही पप्पू कलानी यांच्या चर्चे विना कोणतेही भूमिका घेणार नाही. असे बोलले जाते. 

भाजपाचा कलानीला विरोध आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्यासह अन्य कट्टर भाजप पदाधिकारी कलानी विरोधक आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा