शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा नवा रुग्ण नाही; कल्याण-डोंबिवलीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:28 IST

दोन्ही शहरांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : जानेवारीच्या सुरुवातीपासून वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येत सध्या कमालीची घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. केडीएमसी हद्दीत शुक्रवारी एकही कोरोनाबाधित आढळून न आल्याने दोन्ही शहरांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. 

मनपाच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्च २०२० ला सापडला. पहिल्या लाटेत एका दिवसात सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. तर पहिल्या लाटेत सर्वांत कमी दैनंदिन रुग्णसंख्या २४ नोंदविली गेली. तर दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला. यात सर्वाधिक नागरिक बाधित झाले. तसेच मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्या लाटेत एका दिवसात दोन हजार ४०५ रुग्ण आढळले होते. मात्र ही लाट ओसरल्यावर सर्वांत कमी रुग्णसंख्या ६  इतकी नोंदविली गेली होती. 

तिसऱ्या लाटेत सर्वाधिक एक हजार ६७२ रुग्ण एका दिवसात आढळले होते. परंतु आता लाट ओसरल्यावर नव्या आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या शून्य होती. गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदाच शुक्रवारी शून्य रुग्णसंख्येची झालेली नोंद नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी २६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सध्या केवळ १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एकाचाही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत एकूण एक लाख ६३ हजार ५०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शिवसेनेकडून आयुक्तांचे अभिनंदन

केडीएमसी हद्दीत शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याने शिवसेनेने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले. शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विधानसभा संघटक तात्या माने यांनी सूर्यवंशी यांना शाल-पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका