शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

असंतोषाला तोंड देणे कठीण जाईल म्हणून मंत्रीमंडळ विस्तार नाही - एकनाथ खडसे

By प्रशांत माने | Updated: January 29, 2023 17:03 IST

‘सी’ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्व्हे सद्य परिस्थितीवर आधारित असल्याचे भाष्य केले.

कल्याण: मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास भाजप व शिंदे गटात असंतोष उफाळून येईल व असंतोषाला तोंड देणं कठीण जाईल म्हणून विस्तार केला जात नाही असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी कल्याणमध्ये केले. लेवा पाटीदार समाजाच्या मेळाव्यासाठी आलेल्या खडसेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारासहीत अनेक मुद्यांवर बोलताना सरकारला लक्ष केले.

सरकार स्थापन होवून सात महिने झाले मात्र आजही मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. १८ मंत्री या राज्याचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे योग्य ते निर्णय होवू शकत नाही जनसंपर्क कमी पडतोय. सरकारमधील सर्वच आमदार मंत्रीमंडळात यायला इच्छुक आहेत. त्यामुळे कुणाला घ्यावे हा पेच असल्याने विस्तार होत नाही. विस्तार झाल्यास असंतोष उफाळेल आणि त्याला तोंड देण कठीण जाईल म्हणून विस्तार लांबणीवर पडल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती झाली मात्र याबाबत युतीचा प्रस्ताव किंवा कुठलेही बोलणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झालं नाही. तसा प्रस्ताव आल्यानंतर वरिष्ठ नेते त्याबाबत निर्णय घेतील असे खडसे यांनी बहुजन वंचित आघाडी व शिवसेना यांच्या युतीबाबत बोलताना स्पष्ट केले.

सद्य परिस्थितीच प्रतिबिंब ‘सी’ सर्व्हेत दिसतेय‘सी’ सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ४० जागा मिळतील असा दावा करण्यात येतोय. याबाबत बोलताना खडसे यांनी हा सर्व्हे सद्य परिस्थितीवर आधारित असल्याचे भाष्य केले. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो यावर सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत असताना निव्वळ सत्तेच्या लालसेपोटी हे सरकार स्थापन झाले. अलीकडे राज्यात महागाई, बेरोजगारी हे प्रश्न आहेत इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जातात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महाराष्ट्रावर ६ लाख ६६ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतोय. एकंदरीत सर्व स्थिती पाहता सर्वसामान्य माणूस प्रत्यक्ष स्थिती अनुभवतोय त्यामुळे या सरकारचा विरोधात तो मतदान करेल अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली.

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसे