शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या संथगती कामाचा मनसेकडून समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:09 IST

‘लोकमत’च्या वृत्ताची घेतली दखल : गांधीगिरी मार्गाने केला यंत्रणेचा निषेध

डोंबिवली :  ठाकुर्ली परिसरातील ९० फिट रोड आणि रेल्वे समांतर रस्त्यावर गेली दोन वर्षे संथगतीने सुरू असलेल्या कामांबाबत गुरुवारच्या ‘लोकमत’मध्ये ‘दोन वर्षे रस्त्याची कामे सुरू असल्याने गैरसोय’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध होताच मनसेने याची दखल घेत अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदविला. येत्या दोन दिवसात ९० फिट रोड वाहतुकीसाठी खुला केला नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी यावेळी दिला. केडीएमसी परिक्षेत्रात अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी असो अथवा महानगर गॅसवाहिनी टाकण्याची  कामे करण्यात आली. परंतु ठाकुर्लीतील ९० फिट रोड आणि कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर मात्र दोन वर्षांहून अधिक काळ ही कामे सुरू आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगर गॅसच्या माध्यमातून ही कामे सुरू करण्यात आली, परंतु ही कामे संथगतीने सुरू असल्याने दोन्ही रस्त्यांवरील एका दिशेकडील रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. याचाच एक भाग असलेल्या कल्याणहून डोंबिवलीकडे येणाऱ्या समांतर रस्त्यावर मलवाहिनी टाकण्याचे काम मार्गी लागूनही डांबरीकरण झालेले नाही. तर ९० फिट रोडवरील म्हसोबा चौक ते  खंबाळपाडा रोडकडे जाणारा रस्ताही अनेक दिवसांपासून खोदकामांमुळे बंद आहे. खंबाळपाड्यातून म्हसोबा चौकाकडे येणारा मार्गही खड्ड्यात गेल्याने वाहनचालकांची कसरत सुरूच आहे. ही कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असो अथवा महानगर गॅसच्या माध्यमातून सुरू असली तरी त्यावर केडीएमसीचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. दरम्यान, गुरुवारी यासंदर्भातील वृत्त प्रकाशित होताच घरत यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत संथगती कामाबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन जाब विचारला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी ९० फिट रोडवरील एका दिशेने झालेल्या कामाच्या ठिकाणी डांबरीकरण करून तातडीने रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला जाईल असे आश्वासन दिले.   

टॅग्स :MNSमनसे