शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह सज्ज! शनिवारी आणि रविवारी रसिकांचं होणार मनोरंजन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 19:48 IST

Dombivali News : डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात अभिनेता प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्यप्रयोगानं होणार आहे.

कल्याण - कल्याण-डोंबिवली शहरं आजही आपलं मराठमोळपण जपून आहेत. रसिकप्रेक्षकांचीही येथे कमी नाही. आजही आवर्जून नाटकं पाहणा-यांची मोठी संख्या या ठिकाणी आहे. इतकंच नाही तर बदलापूर, अंबरनाथ या शहारातूनही खास नाटक  पाहण्यासाठी रसिक कल्याण डोंबिवलीत येतात. कोरोनामूळे नाट्यगृह बंद असल्याने मनोरंजनाला ब्रेक लागला होता. मात्र आता काही नियमांवलीसह नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्यानं कल्याण डोंबिवलीतील दोन्ही नाट्यगृह प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज झाली आहेत. शनिवारी डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात अभिनेता प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाट्यप्रयोगानं होणार आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात पहिल्या नाट्यप्रयोगाचा मान डोंबिवलीला मिळाला आहे.

              डोंबिवलीकरांचा तिकीट बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याबाबत प्रशांत दामले यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरातही रविवारी  गाव तसं चांगलं या नाटकाचा प्रयोग संपन्न होणार असून जंतुनाशक फवारणी, सोशल  डिस्टन्सिंग व इतर तयारीला सुरुवात झाली आहे. नाट्यनिर्मात्यांनी या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयोग लावावेत. कल्याण डोंबिवलीकर ते हाऊसफुल नक्की करतील.रसिकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत  असं मत सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे  व्यवस्थापक  दत्तात्रय लधवा यांनी सांगितलं आहे. कल्याणमधील अत्रे रंगमंदीरातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आलं आहे. रविवारी मालवणी नाटकाने नाट्यगृह पुन्हा सुरू होत असल्याने खास शैलीत रविवारी प्रेक्षकांच स्वागत करण्यात येणार असल्याच व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत अखेर तिसरी घंटा रसिकांच्या कानावर पडणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली