शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे नाव घ्या; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचा पालकमंत्र्यांना आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 18:48 IST

भेदभाव नाही; आपण एकच असल्याचे पालकमंत्र्यांचे उत्तर

कल्याण- कल्याणडोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावकर सभागृहाचे नुतनीकरण केल्यावर हे सभागृह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारचे नाव घ्या अशी आग्रही मागणी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी केली असता त्यावर पालकमंत्री यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये भेदभाव नाही. आपण सगळे एकच आहोत असे उत्तर देत पाटील यांच्या मागणीला बगल देण्याचा प्रयत्न केला. 

स्मार्ट सिटी प्रकल्पातून खाडी किनारा विकास आणि नौदल संग्रहल उभारले जात आहे. त्याला केंद्राचा निधी प्राप्त झालेला आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पाटील यांनी स्वातंत्र्य वीर सावरकरांचे नाव घ्या असे पालकमंत्र्यांना सांगितले. पालकमंत्र्यांनी यावेळी सावरकरांचे नाव घेतले. मात्र स्मार्ट सिटीतून विकास कामे केली जात असल्याचा उल्लेख केला. त्यावर स्मार्ट सिटीला निधी केंद्र सरकारने दिला आहे.

केंद्र सरकारचे नाव घ्या असा आग्रह धरला त्यावर पालकमंत्र्यांनी केंद्र आणि राज्य सरकार असा भेदभाव नाही. आपण एकच आहोत असे उत्तर पाटील यांना दिले. तसेच व्यासपीठावर भाजप आमदार रविंद्र येण्यास पालकमंत्र्यांनी सांगितले ते मात्र खालीच प्रेक्षकांमध्ये उभे होते. त्यांनी वरती जाणो पसंत केले नाही. चव्हाण हे खाली का उभे होते याबाबत पाटील यांना विचारले असता त्यांनाच विचारा ते का खाली उभे होते असे ते म्हणाले.

कार्यक्रम संपताच केंद्रीय मंत्री पाटील यांनी सांगितले स्मार्ट सिटीला केंद्राकडून 16 कोटी 5क् लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. त्याठिकाणी केंद्राचा बोर्ड लावला जात नाही. कोणी बोर्ड लावला नाही तर मी त्याठिकाणी बोर्ड लावणार आहे. शहराच्या विकासात राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्रित आले पाहिजे. 

जाणारे मूळचे भाजपचे नव्हते..

भाजपचे नगरसेवक शिवसेनेत गेले ते भाजपमध्ये राष्ट्रवादीतून आले. ते मूळचे भाजपचे नव्हते. मी सुद्धा राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलो. त्यांना आत्ता त्यांचे भवितव्या भाजपमध्ये वाटत नसले तरी त्यांनी असे करणो चूकीचे आहे. मनसेसोबत भाजपची युती याविषयी वरच्या पातळीवर चर्चा झालेली नाही. त्याबाबत खालच्या पातळीवर चर्चा असली तरी दोन व्यक्ती एकत्रित येऊन झाडाखाली चर्चा करता. ही सोयीची चर्चा आहे असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीEknath Shindeएकनाथ शिंदे