शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही - खासदार श्रीकांत शिंदे 

By अनिकेत घमंडी | Updated: September 11, 2022 17:32 IST

माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघाला कोणताही धोका नाही असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.  

डोंबिवली: २०२४ मधील लोकसभा निवडणुकांचे लक्ष्य ठेवून ज्या ठिकाणी भाजपचे खासदार नाहीत अशा सर्व ठिकाणी केंद्रीय स्तरावरून वरिष्ठ नेते पाठवून तेथे पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी व्यूह रचना करण्यात आली असून त्या उद्देशाने कल्याण लोकसभेत देखील केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या तीन दिवसीय आढावा दौऱ्याला रविवारी सुरुवात झाली असून माझ्या कल्याण लोकसभा मतदार संघाला मात्र कोणताही धोका नाही, असे वक्तव्य खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ठाकूर यांचा दौरा घोषित झाल्यापासून शिंदे यांच्या उमेदवारीला धोका, कल्याण लोकसभेवर भाजपचा दावा अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्या चर्चा आता थांबवा असेही शिंदे म्हणाले. 

राज्यातील १६ लोकसभा मतदारसंघात भाजपचे वरिष्ठ नेते प्रवासाला जाणार असल्याचे नियोजन हे ६ महिने आधी ठरवण्यात आले होते, राज्यात तीन महिन्यांपूर्वी शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या युतीचे सरकार आले, त्यामुळे नियोजित दौरा त्यांनी केला. अशा सकारात्मक दृष्टीने त्या दौऱ्याकडे आम्ही बघत असून माध्यमांनी मसाला लावून वृत्त देणं थांबवा असे आवाहन शिंदे यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आगामी काळात भाजप शिवसेना यांच्यात युती होऊन निवडणूका लढवल्या जातील असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे कल्याण लोकसभेतून पुन्हा मलाच उमेदवारी मिळेल आणि युतीच्या माध्यमातून आम्ही सगळे कार्यरत राहू असे देखील शिंदे म्हणाले. 

 ठाकूर यांनी घेतला मोदकाचा आस्वाद मंत्री अनुराग ठाकूर हे डोंबिवलीत येताच त्यांचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले, त्यापाठोपाठ खासदार शिंदे यांनीही त्यांचे स्वागत केले. स्वागत समारंभापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिंदेंच्या निवासस्थानी ठाकूर, चव्हाण यांनी जाऊन चहापानाचा आस्वाद घेतला, त्यावेळी ठाकूर यांनी आवर्जून मोदक खाऊन गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रसाद मिळाला असे सांगून आनंद व्यक्त केला.

कल्याणच्या जागेवर भाजपचा दावा नाही - ठाकूर कल्याण लोकसभेत आमचे मित्र खासदार शिंदे हे कार्यरत असून पक्ष संघटन बळकटी देण्याचे कार्य आम्ही करत आहोत, त्याचा एक भाग म्हणून हा दौरा आहे. या मतदार संघावर भाजपचा दावा असा कोणताही हेतू नाही, मोदक गोड होता, त्यात माध्यमांना वाटतं म्हणून मसाला लावून त्याची गोडी का घालवावी असे मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीShrikant Shindeश्रीकांत शिंदेAnurag Thakurअनुराग ठाकुरkalyanकल्याण