शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेने दिल्या मंत्री रविंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By मुरलीधर भवार | Updated: September 20, 2023 16:08 IST

राजकारणात काय कोण करेल आणि कोण कधी कोणीची तळी उचलेल हे सांगता येत नाही.

कल्याण-राजकारणात काय कोण करेल आणि कोण कधी कोणीची तळी उचलेल हे सांगता येत नाही. तसाच एक अजब प्रकार कल्याण ग्रामीणमध्ये समोर आला आहे. राजकीय मैत्री पक्षभेदाच्या पलिकडे असू शकते. मात्र रस्ते प्रकरणी सार्वजनिक मंत्री रविंद्र चव्हाण यांन टिकेचे लक्ष्य करणाऱ्या मनसने चक्क त्यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर कल्याण शीळ रस्त्यावर लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या शुभेच्छा बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचाही फाेटो झळकला आहे. त्यामुळे या बॅनरविषयीच एकच चर्चा रंगली आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची रखडपट्टी झाल्याने मनसेचे प्रमुख राज ठाकर यांनी राज्य सरकारला टिकेचे लक्ष केले होते. या रस्त्यावर आंदालन करा असे मनसे सैनिकांना आवाहन केले होते. मनसेचे राजू पाटील यांनी मुंबई गोवा महामार्गावर जाऊन रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत मुंबई गोवा मार्गावर चर्चा सत्र घेतले. या चर्चा सत्रात चव्हाण यांनी मी कोणालीही सोडणार नाही.

रस्त्याचे काम पूर्ण करणार असा अप्रत्यक्ष इशारा मनसेला दिला होता. मात्र त्यानंतरही मनसेने रस्ते रखडपटटी प्रकरणी भाजपच्या मंत्र्यांना टार्गेट करणे सोडले नाही. दुसरीकडे मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण ज्या मतदार संघातून निवडून आले आहेत. त्या डोंबिवलीतील शहरातील रस्ते खड्ड्यात आहेत. रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधले होते. या सगळया पार्श्वभूमीवर मनसेचे काटई येथील उपसरपंच काशीनाथ पाटील यांनी मंत्री चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर लावला आहे. त्या बॅनरवर मंत्री चव्हाण यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे पदाधिकारी विनोद पाटील आणि विशेष म्हणजे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे फोटो झळकले आहेत. एकीकडे रस्ते प्रकरणी चव्हाण यांना टिकेचे लक्ष्य करणारी मनसे आत्ता त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा बॅनर लावत आहे. त्यामुळे या राजकारणात मनसेची नक्की भूमिका काय आहे याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.