शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मनसेचा केडीएमसी मुख्यालयावर मूक मोर्चा

By मुरलीधर भवार | Updated: July 26, 2023 18:06 IST

महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याकडे महापालिका लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने महापालिका मुख्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर, जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, महिला आघाडीच्या उर्मिला तांबे यांच्यासह मनसेचे गणेश चौधरी, कपील पवार, रोहन आक्केवार, गणेश लांडगे यांच्यासह मनसे कार्यकर्ते या मूक मोर्चात सहभागी झाले होते. तोंडावर काळ्या फिती लावून हातात महापालिकेच्या निषेधाचे फलक मनसे कार्यकर्त्यांनी घेतले होते. मनसेचे जिल्हाध्यक्ष भोईर यांनी सांगितले की, येत्या आठवडाभरात रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाही तर या पूढचा मोर्चा हा ठोक मोर्चा असेल. या ठोक मोर्चात मनसे काय करणार हे अधिकारी वर्गाला चांगले ठाऊक आहे.

महापालिकेने खड्डे बुजविण्याच्या कामाकरीता जवळपास १७ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. महापालिकेने १० प्रभागातील खड्डे बुजविण्यासाठी १३ कंत्राटदाराना काम दिले आहे. जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहन चालक आणि प्रवाशांना प्रवास करताना त्रास होत आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. तसेच कल्याण मलंग रोडवर एका तरुणाचा रस्त्यावरील खड्डा वाचविताना ट्रक खाली सापडून मृत्यू झाला. महापालिका प्रशासनाकडून जबाबदार अभियंता आणि कंत्राटदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला जातो. प्रत्यक्षात जबाबदार कंत्राटदार आणि अभियंत्याच्या विरोधात अद्याप महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली गेलेली नाही. कारवाई शून्य आहे. तर खड्डेही भरले जात नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपये कंत्राटदार खड्डे न भरता खिशात भरणार असा आरोप मनसेच्या वतीने मूक मोर्चाच्या वेळी करण्यात आला आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMNSमनसे