शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

Metro: आता कल्याण- तळोजा मार्गावरही मेट्रो धावणार, १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

By मुरलीधर भवार | Updated: February 17, 2023 15:47 IST

Kalyan-Taloja Metro: कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. 

- मुरलीधर भवार 

कल्याण - कल्याण तळाेजा मेट्राेच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात हाेणार आहे. या कामासाठी १ हजार ५२१ काेटींची निविदा एमएमआरडीएने जाहिर केली आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग आणि १७ रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दाेन दिवसापूर्वी कल्याणमधील विविध विकास कामांचे लाेकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मेट्राेच्या कामाला गती देणार असे सांगितले हाेते. अवघ्या दाेनच दिवसात निविदा जाहिर करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे. कल्याणचे  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळे हा मार्ग आता दृष्टीपथात येणार आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पहिले जाते.  या प्रकल्पामुळे ठाणे पल्याड राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबईसह ठाणे आणि ठाणेपल्याड कल्याण- डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. या अंतर्गत ठाणे - भिवंडी - कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात १७ स्थानके आहेत. या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. या मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. येत्या अडीच वर्षाच्या कालावधीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण होणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

१७ मेट्राे स्टेशनगणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश आहे. 

निश्चित कालावधी आधीच काम पूर्ण करण्याचा मानसकल्याण तळोजा मेट्रो मार्गिका आणि स्थानकांच्या प्रत्यक्ष  बांधकामांच्या निविदा जाहीर झाल्या असून या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर  निश्चित कालावधीच्या आधीच या मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत. -खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

टॅग्स :Metroमेट्रोkalyanकल्याणthaneठाणे