शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जीर्ण नारळाचे झाड पडून कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात मेडिकल दुकान, घरांचे नुकसान

By मुरलीधर भवार | Updated: July 3, 2024 18:16 IST

पडलेले झाड इलेक्ट्रील कटरने कापून दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण पूर्वेत आज दुपारी तीन वाजताच्या सुमार तिसगाव रोड म्हसोबा चौकात एक जुनाट झालेले नारळाचे झाड मेडिकल दुकान आणि घरांवर कोसळल्याने दुकान आणि घराचे नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पडलेले झाड इलेक्ट्रील कटरने कापून दूर करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले.

हे नारळाचे झाड जुनाट हाेते. आज पाऊस कमी असला तरी वारा सुटला होता. वारा सुटल्याने जुनाट नारळाच्या झाडाची मुळे कमकूवत झाली होती. ते दुपारी कोसळले. हे झाड मेडिकल दुकानासह एका घरावर पडले. या घटनेत कोणतीही जखमी झालेले नाही. ही घटना घडताच परिसरातील नागरीकांसह दुकानात आैषधे घेत असलेल्या ग्राहकांनी पळ काढला. हे झाड पडल्याने या परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला. विजेच्या तारा झाड पडल्याने तुटल्या आहेत. जवळस असलेले विद्युत रोहित कोलमडले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी धाव घेत पडलेले झाड इलेक्ट्रीकल कटरने कापून दूर करण्याचे काम केले आहे. या घटना घडल्याचे कळताच शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनीही घटनास्थळी धाव घेतली. या भागातील जुनाट आणि धोकादायक झालेली झाडे पाडण्यात यावी अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, जुनाट आणि धोकादायक झाडे तोडण्यात यावी अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे यापूर्वीच केली होती. त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे ही घटना घडली. या घटनेत कोणाचा जीव गेला असता. आत्ता तरी महापालिकेने जागे होऊन जुनाट असलेली धोकादायक झोड तोडण्याची कारवाई करावी याकडे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण