शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथींतर्फे कल्याणमध्ये १० रुपयांत जेवण, १ रुपयांत नाश्ता; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘गरीब थाळी’ला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 12:46 IST

फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

कल्याण : कल्याणमध्ये तृतीयपंथींच्या ख्वाहिश फाऊंडेशनच्यावतीने गरीब थाळी सुरू करण्यात आली आहे. या केंद्राचा प्रारंभ मंगळवारी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला. दहा रुपयांत थाळी आणि एक रुपयांमध्ये नाश्ता दिला जाणार आहे.फाऊंडेशनच्या संस्थापकीय अध्यक्षा तमन्ना मन्सुरी, सल्लागार पूनम सिंग, रिपाइंचे अण्णा रोकडे, भीमराव डोळस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा गरीब थाळीचा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या गरीब थाळी केंद्राच्या माध्यमातून आदिवासी, गरीब, गरजू विधवा आणि तृतीयपंथींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून सात तृतीयपंथी बारावीची  आणि तीन जण बी.कॉम.ची परीक्षा देणार आहेत. किन्नर, गरजू, विधवा आणि आदिवासी निराधारांना आसरा नाही. त्यांच्यासाठी मुरबाड येथे दहा एकर जागा आहे. त्याठिकाणी निवारा उभारण्यासाठी बांधकाम साहित्याची गरज आहे. ते देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्षा मन्सुरी यांनी यावेळी केली. ६५ वर्षीय तृतीयपंथींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मानधन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. 

तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीत ठाणे अव्वलजिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, तृतीयपंथीयांचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यात रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र देण्याचे काम सुरू आहे. राज्यभरातून ठाणे जिल्ह्यात ७८२ तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा हा तृतीय पंथीय मतदारांची नोंदणी करण्यात अव्वल ठरला आहे. 

 

टॅग्स :kalyanकल्याणTransgenderट्रान्सजेंडरfoodअन्न